Ujjwal NIkam | X

लोकसभा निवडणूकीमध्ये उत्तर मध्य मुंबई मधून कॉंग्रेसच्या वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी पराभव केल्यानंतर उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांच्या गळ्यात पुन्हा राज्याचे विशेष सरकारी वकील (Special Public Prosecutor) म्हणून पद पडले आहे. यापूर्वी निकम यांच्याकडे असलेल्या सर्व खटल्यांचे कामकाज ते पुन्हा सुरू करणार आहेत. परंतू यावर कॉंग्रेस पक्षाकडून आक्षेप घेण्यात आला आहे. नाना पटोले यांनी X वर पोस्ट करत याबद्दल संताप व्यक्त केला आहे.

उज्ज्वल निकम यांना भाजपा कडून लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र 4 जूनला निवडणूकांचे निकाल लागल्यानंतर पंधरवडा पार पडायच्या आतमध्येच महाराष्ट्र सरकारने पुन्हा त्यांना राज्याच्या विशेष सरकारी पदी नियुक्त केले आहे. भाजप उमदेवाराला सरकारी वकील करता येणार नाही, अशी भूमिका काँग्रेसने मांडली आहे. नक्की वाचा: Nana Patole On Party Worker washing His Feet: नाना पटोले यांचे पाय कार्यकर्त्याने धुतल्याचा व्हिडिओ झाला वायरल; पहा कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांनी दिलेलं स्पष्टीकरण (Watch Video). 

पहा नाना पटोले यांची पोस्ट

वर्षा गायकवाड यांनी नाना पटोले यांचा 2 हजार मतांनी पराभव केला आहे. दरम्यान निकम यांनी या निवडणूकीला सामोरं जाताना आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. राज्य सरकारने न्याय व्यवस्थेच्या माध्यमातून पाप केलं, उज्वल निकम भाजपचे लोकसभेचे उमेदवार असताना त्यांना सरकारी वकील करून त्यांनी सिद्ध केलं की सरकारी वकीलही भाजपचे राहणार. पण भाजपच्या उमेदवाराला सरकारी वकील करता येणार नाही, ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे असे नाना पटोले यांनी म्हटलं आहे.