Ujjwal Nikam (Photo Credit: Facebook)

वर्धा (Wardha) जिल्ह्यातील हिंगणघाट (Hinganghat) येथे एकतर्फी प्रेमातून शिक्षिकेला भररस्त्यात जिंवत जाळल्याची घटना सोमवारी घडली होती. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रातून संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. या घटनेच्या निषेधार्थ अनेक ठिकाणी मोर्चा निघाले आहेत. तसेच याप्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणीही केली जात आहे. यातच महाराष्ट्र सरकारकडून ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ वकील उज्ज्वल निकम यांची नेमणूक करण्यात आली आहे. यामुळे हिंगघाट प्रकरणातील पीडित तरूणींना लवकरच न्याय मिळेल, अशी अपेक्षा संपूर्ण महाराष्ट्रातून केली जात आहे. हे देखील वाचा- मुंबई: बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यास नकार दिल्याने तरुणीवर ज्वलनशील पदार्थ टाकून जाळण्याचा प्रयत्न; आरोपीं अटकेत

हिंगणघाट प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात येणार आहे. हा खटला ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम लढतील अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली होती. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने नुकतीच उज्ज्वल निकम यांची नेमणूक करण्यात आली आहे, अशी माहिती एएनआय वृत्त संस्थेने दिली आहे. हिंगणघाटमध्ये सोमवारी 3 फेब्रुवारी रोजी एका प्राध्यापिकेला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. या पीडित तरुणीची प्रकृती चिंताजनक असून तिची मृत्यूशी झुंज सुरु आहे. याप्रकरणी आरोपी विकी नगराळे याला अटक करण्यात आली असून त्याला 8 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाचा तपास महिला उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे देण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी दिली. हे देखील वाचा- संतापजनक! वर्ध्यानंतर औरंगाबाद येथेही एका नराधमाने महिलेवर रॉकेल ओतून तिला पेटवून दिले

एएनआयचे ट्वीट-

वर्धा येथे घटना घडल्यानंतर औरंगाबाद आणि मुंबईमध्येही महिलेवर रॉकेल ओतून पेटवून दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वर्धा आणि औरंगाबाद प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केली असून मुंबई प्रकरणातील आरोपीचा शोध घेतला जात आहे.