School students. (Credits: PTI | Representational Image)

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर आता राज्यातील EWS, SEBC आणि OBC विद्यार्थींनीसाठी सरकारने नव्या निर्णयांची घोषणा केली आहे. व्यवसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेणाऱ्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्कामध्ये 50 टक्क्यांऐवजी आता 100 टक्के शिक्षण शुल्क माफी देण्यात आली आहे. 2024-25  पासून ही योजना लागू होणार असून त्याचा फायदा राज्यातील 2 लाखांपेक्षा अधिक मुलींना होण्याची शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे..यासाठी कुटुंबांचं प्रतिवर्ष उत्पन्न 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी असणं आवश्यक आहे.

राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू असताना 19 महत्त्वाच्या निर्णयाची आज घोषणा होण्याची शक्यता आहे. दरम्यान व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये आणि उच्च शिक्षणामध्ये अधिकाधिक मुलींचा समावेश वाढवण्यासाठी राज्य सरकारचा हा निर्णय मदत करेल अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे. Majhi Ladki Bahin Yojana Online Registration Process: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कागदपत्रे, नोंदणी, निकष आणि अर्ज कसा करावा? घ्या जाणून .

 

View this post on Instagram

 

A post shared by Pratap Sarnaik (@pratap_sarnaik)

महाराष्ट्र सरकारकडून यापूर्वी ' लेक लाडकी' योजना जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये मुलींना आर्थिक सुरक्षा दिली जाणार आहे. मुलीचा जन्म होताच तिला आर्थिक मदत मिळणार आहे.