महाराष्ट्र सरकार कडून नाशिक येथे अडकलेल्या 130 यात्रेकरुंची बसच्या माध्यमातून पंजाब मध्ये पाठवणी, 14 दिवसांचा क्वारंटाइनचा सल्ला
नाशिक मध्ये अडकलेल्या यात्रेकरुंची पंजाब मध्ये पाठवणी (Photo Credits-ANI)

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सरकारने लॉकडाउनच्या आदेश घोषित केला होता. त्यामुळे विविध ठिकाणी स्थलांतरित कामगार, विद्यार्थी आणि यात्रेकरुन अडकून पडले आहेत. मात्र लॉकडाउनमुळे अडकलेल्या या सर्वांना आपल्या राज्यात परत पाठवणी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. केंद्र सरकारने याबबात विविध राज्य सरकारला आदेश देत त्यांच्या राज्यातील कामगार, विद्यार्थी आणि यात्रेकरुंना फिटनेस टेस्ट सर्टिफिकेट आणि रजिस्ट्रेशन करुन पाठवले जात आहेत. याच दरम्यान, नाशिक (Nashik) येथे अकडलेल्या 130 जणांना महाराष्ट्र सरकारने पंजाब (Punjab) मध्ये पाठवले आहे. या यात्रेकरुंना बसच्या माध्यमातून पाठवण्यात आले असून त्यांना 14 दिवसांसाठी क्वारंटाइनचा सल्ला देण्यात आला आहे.

नाशिक मधील मनमद परिसरातील गुरुद्वारात 130 यात्रेकरु लॉकडाउनमुळे अडकले होते. त्यांच्यासाठी आता महाराष्ट्र सरकारने बसची सुविधा उपलब्ध करुन देत त्यांना पंजाब राज्यात पाठवणी केली आहे. या सर्व यात्रेकरुंची स्क्रिनिंग चाचणी केल्यानंतरच त्यांना पाठवले असल्याचे ही स्पष्ट करण्यात आले आहे. यापूर्वी सुद्धा महाराष्ट्रात अडकलेल्या पंजाब मधील यात्रेकरुंची पाठवणी करण्यात आली होती. परंतु त्यावेळी पंजाबच्या आरोग्यमंत्र्यांनी महाराष्ट्र सरकारवर टीका केली होती. कारण पंजाब मधील कोरोनाबाधितांचा आकडा 300 वरुन अचाकन 1 हजारांच्या पार गेला होता.(Coronavirus in India: भारतात एकूण 52,952 कोरोना बाधित तर कोरोनामुक्त झालेल्यांची संख्याही दिलासादायक)

दरम्यान, लॉकडाउनमुळे हातावर पोट असलेल्या बहुतांश कामगार आणि मजूर वर्गाला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. त्यामुळे या स्थलांतरित कामगार वर्गाने आपल्या घरी पायी चालत जाण्याचा निर्धार केला. मात्र सरकारने यापूर्वी स्थलांतरित कामगारांना राज्य सोडून जाऊ नये असे आवाहन केले होते. त्याचसोबत त्यांच्यासाठी शेल्टर होमची सुद्धा सुविधा उपलब्ध करुन दिली. मात्र आता केंद्र सरकारने विविध राज्यात लॉकडाउनमुळे अडकलेल्या कामगार वर्गाला आपल्या जिल्ह्यात जाण्यासाठी श्रमिक स्पेशल ट्रेनची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.