Dahanu: पालघरच्या डहाणू येथे मालगाडीचा डबा रेल्वे रूळावरून घसरला
Railway (Photo Credits:Twitter)

पालघरच्या (Palghar) डहाणू (Dahanu) येते मालगाडीचा डबा रेल्वे रुळावरून घसरल्याने मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या गाड्या उशिराने धावत होत्या. डहाणूरोड रेल्वे स्थानकापासून जवळच दक्षिणेकडे अदानी औष्णिक विद्युत केंद्रात कोळसा खाली करून मालगाडी गुजरात कडे जाण्यास निघाली होती. मात्र, रेल्वेलाईन उखडून गेल्याने या मालगाडीचा डबा रेल्वे रुळावरून घसरला. ज्यामुळे येणाऱ्या आणि जाणाऱ्या गाड्या पंधरा ते वीस मिनिटांनी उशीराने धावत होत्या.

मिळालेल्या माहितीनुसार, डहाणू येथील अदानी औष्णिक विद्युत केंद्रात कोळसा खाली करून गुजरातकडे निघालेल्या मालगाडीचा डबा आज सकाळी 9.42 वाजता रुळावरून घसरला. दरम्यान, रेल्वेलाईन उखडून गेली. त्यानंतर आज संध्याकाळपर्यंत रेल्वे लाईन दुरुस्त करण्याचे काम सुरू होते. ज्यामुळे ये-जा करणाऱ्या गाड्या उशिराने धावत होत्या. तर, काही मालगाड्या जवळच्या रेल्वे स्थानकादरम्यान थांबविण्यात आल्या होत्या. हे देखील वाचा- Pushpak Express Gang Rape: लखनौ-मुंबई पुष्पक एक्सप्रेस मध्ये महिलेवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील 8 आरोपींना अटक

मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर दोन आठवड्यापूर्वी अपघात अशीच एक घटना घडली होती. इंदोर पुणे रेल्वेचे दोन डबे रुळावरून घसरले होते. लोणावळा रेल्वे स्टेशनजवळ ही घटना घडली होती. रेल्वेच्या मागच्या बाजूच्या या दोन्ही बोगी होत्या, त्यात प्रवासी देखील होते. पण थांबविण्याच्या उद्देशाने रेल्वेचे स्पीड कमी केल्याने मोठी दुर्घटना टळली होती.