Gold and Silver Rate Today: दिवाळीसाठी सोने-चांदी खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या आजचे दर
Jewellery (Photo Credits: Pixabay)

दिवाळीचा सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन पोहचला आहे. तर दिवाळीच्या शुभमुहूर्तावर बहुतांश लोक सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करतात. तत्पूर्वी गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर वाढत असल्याचे दिसून येत आहे. तसेच दिवाळीपर्यंत सोन्याचे दर 40 हजारांचा आकडा पार करणार अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती. तसेच दिवाळी पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने त्यादिवशी देखील सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी झुंबड उडते. परिणामी जसा सण आणि मुहूर्त जवळ येतो तसे भाव देखील वाढतात.तर पहा तर पहा महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर सारख्या प्रमुख शहरांमध्ये काय आहे आजचा सोन्याचा दर?

महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर मध्ये सोन्याचा दर काय?

मुंबई - ₹ 38,500/ प्रति दहा ग्राम

पुणे - ₹ 38,500/ प्रति दहा ग्राम

नाशिक - ₹ 38,500/ प्रति दहा ग्राम

नागपूर - ₹ 38,500/ प्रति दहा ग्राम

चांदीचा दर मुंबई, नाशिक, नागपूर, पुणे शहरामध्ये किती?

सोन्यापेक्षा चांदीचे दर अधिक वाढले असून मुंबई, नाशिक, नागपूर, पुणे शहरासह अन्य ठिकाणी दर 48,100 प्रति किलो राहिले आहेत.

हे दर गुड ₹ रिटर्न्स (Good₹Returns) वेबसाईटनुसार दिले आहेत.