Maharashtra: महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना 100 कोटी रुपयांच्या वसूली प्रकरणी तपासाला वारंवार सामोरे जावे लागत आहे. तर माजी पोलीस आयुक्त परम बीर सिंह यांनी अनिल देशमुखांवर 100 कोटी रुपये वसूलीचा आरोप लावणाऱ्या लेटरबॉम्बमुळे हे प्रकरण अधिकच चिघळले गेले आहे. या प्रकरणी सध्या ईडी कडून चौकशी केली जात आहे. तर अनिल देखमुख यांना चौकशीसाठी ईडीने समन्स धाडले होते. मात्र त्यांनी व्हिडिओ कॉन्फ्रेन्सिंगच्या माध्यमातून जबाब नोंदवू असे म्हटले होते. पण आता अचानक अनिल देशमुख हे दिल्लीत रवाना झाले आहेत. यामुळे आता जोरदार चर्चा सुरु झाल्या आहेत. नेमक्या कोणत्या कारणामुळे अनिल देशमुख दिल्लीकडे रवाना झाले हे अद्याप अस्पष्टच आहे.
दुसऱ्या बाजूला अनिल देशमुख यांनी त्यांच्या विरोधात सुरु असलेल्या सीबीआय तपास हा अवैध असल्याचे म्हटले आहे. सीबीआयकडून त्यांच्या पदाचा दुरोपयोग करुन भ्रष्टाचाराप्रकरणी तपास करत आहेत. तसेच अनिल देशमुख यांचे वकील अमित देसाई यांनी उच्च न्यायालयाला म्हटले होते की, देशमुख यांच्या विरोधातील सीबीआय चौकशी ही उच्च न्यायालयाच्या आदेशावरुनच सुरु झाली होती. परंतु या चौकशीपूर्वी कायद्यांचे पालन करण्यात आलेले नव्हते. त्यावेळी देशमुख हे सार्वजनिक सेवेत होते. त्यांच्या विरोधात तपास सुरु करण्यापूर्वी राज्य सरकारकडून परवानगी घ्यायला हवी होती. परवानगी घेतली नव्हती म्हणून हा तपास बेकायदेशीर आहे.(Anil Deshmukh: धोका आहे!, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ईडी चौकशीला जाणे टाळले, पत्र लिहून कळवले कारण)
तर ईडीने मला कागदपत्रांसहीत उपस्थित रहावे असे दोन समन्स पाठविले असल्याचे अनिल देशमुख यांनी ट्विट करत म्हटले होते. त्यात पुढे असे म्हटले की, मी ईडीला दोन सविस्तर पत्रे पाठवून मला 'ECIR' ची कॉपी द्यावी आणि त्यांना जी कागदपत्रे हवी आहेत त्यांची यादी द्यावी, अशी विनंती केली आहे. जेणेकरून मला या कागदपत्रांची जुळवाजुळव करून ती ईडीला पाठविता येईल. त्याचबरोबर इतर बाबींचा सविस्तर उल्लेख मी माझ्या ईडीला दिलेल्या दोन्ही पत्रांत केला आहे. मी ईडीला यापूर्वीही सहकार्य केले आहे व यापुढेही असेच सहकार्य करत राहील