महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे पुरस्थिती निर्माण झाल्याचे परिस्थिती उद्भवली आहे. या पुराचा फटका राज्यातील विविध भागांना बसला असून तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. याच परिस्थितीवर मात करण्यासाठी आता राजकरणातील नेत्यांपासून ते कलाकारापर्यंत त्यांना मदतीचा हात पुढे करु पाहत आहेत. तर शिवसेना खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी आता महाराष्ट्रातील पुरग्रस्त व्यापाऱ्यांचा जीएसटी (GST) माफ करावा अशी मागणी केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे केली आहे.
कोल्हापूर, सांगली, सातारा यांच्यासह अन्य राज्यात पुरस्थिती निर्माण झाली असून अनेकांना आपली हक्काची घरे सोडावी लागली आहेत. तसेच स्थानिक व्यापाऱ्यांना या पुरामुळे उद्योगधंद्यात तोटा झाला आहे. याच स्थितीत आता राहुल शेवाळे यांना एका पत्राद्वारे केंद्रीय अर्थमंत्र्यांना व्यापाऱ्यांचा GST माफ करावा अशी मागणी केली आहे. तसेच अर्थमंत्र्यांनी जर व्यापाऱ्यांचा GST माफ केल्यास त्यांना मोठा दिलासा मिळेल अशी अपेक्षा सुद्धा शेवाळे यांनी व्यक्त केली आहे.(कोल्हापूर-सांगली मधील पुरग्रस्तांसाठी तुळजापूर तुळजाभवानी संस्थेकडून 50 लाख रुपयांची मदत)
त्याचसोबत शेवाळे यांनी त्यांच्या खासदार निधीमधून पुरग्रस्तांसाठी 25 लाख रुपयांचा मदतनिधी दिला आहे. तसेच पुरग्रस्तांसाठी शिवसेनेचे कार्यकर्ते आणि नेतेमंडळी पुरस्थिती आलेल्या ठिकाणी जाऊन नागरिकांची मदत करत असल्याचे दिसून येत आहेत. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत पुरग्रस्तांसाठी राज्याकडून 6813 कोटींची मदत जाहीर करण्यात येत असल्याची घोषणा केली आहे.