कोरोना विषाणूने संपूर्ण भारतात थैमान घातले आहे. कोरोना विषाणूचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात (Maharashtra) आढळून आले आहेत. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. यातच मुंबई (Mumbai) येथील धारावी (Dharavi) झोपडपट्टीत कोरोनाचे जाळे अधिकच पसरत चालले आहेत. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून या परिसरात अग्निशमन दलाकडून एरिअल मिस्ट ब्लॉविंग मशीनद्वारे निर्जुंकीकरण करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यात कोरोना विषाणूचा वाढता धोका लक्षात घेता आता सरकार अधिक सक्षमतेने त्याचा सामना करण्यासाठी सज्ज झाली आहे. एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, धारावीतील कोरोना बाधितांची संख्या 43 वर पोहचली असून त्यापैंकी 4 रुग्णांना आपला जीव गमवावला लागला आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधितांमध्ये प्रामुख्याने परदेश प्रवास करून आलेल्या व्यक्ती आणि त्यांच्या निकटवर्तीयांमध्ये हा जीवघेणा विषाणू आढळला. त्यांनंतर सर्वत्र पसरला असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र, जनसामान्यांमध्ये कोरोना व्हायरस पसरू नये म्हणून सामाजिक जनजागृती, संचारबंदी ते अगदी आता विविध भागांचं निर्जुंकीकरण करण्यापर्यंत उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता पुढील धोका टाळण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन 31 एप्रिलपर्यंत कायम ठेवण्यात आले आहे. दरम्यान कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. देशातील सर्वाधिक रुग्ण असलेल्या महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1895 झाली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. यातच धारावी येथे सर्वात मोठी झोपटपट्टी असून या ठिकाणी कोरोना प्रादुर्भाव वेगाने होऊ शकतो. यासाठी सरकारकडून या परिसरात पोटेक्टर 600 मशीनद्वारे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. हे देखील वाचा- Coronavirus: महाराष्ट्रात क्वारंटाइनच्या नियमांचे उल्लंघन केल्याने 35 हजार गुन्हे पोलिसात दाखल
एएनआयचे ट्वीट-
Maharashtra: Fire brigade is using advanced level areal mist blowing machine 'Protector 600' at Dharavi slum in Mumbai to disinfect the locality amid #COVID19 outbreak. A total of 43 cases and 4 deaths have been reported here so far. pic.twitter.com/qRKXD5vaL0
— ANI (@ANI) April 12, 2020
जगभरात कोरोनाबाधीतांची संख्या 16 लाख 91 हजार 719 वर पोहचली आहे. यांपैकी 1 लाख 2 हजार 525 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 3 लाख 68 हजार 669 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची माहिती समोर आली आहे. भारतही आता कोरोना विषाणूच्या जाळ्यात अडकत चालला असल्याची चिन्ह दिसू लागली आहे. भारतात आतापर्यंत एकूण 8 हजार 356 कोरोना बाधीत आढळले आहेत. त्यांपैकी 273 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 716 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाबाधीतांची संख्या 1895 वर पोहचली आहे. यात 127 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 208 रुग्ण कोरोना विषाणूच्या जाळ्यातून बाहेर आल्याचे समजत आहे.