महाराष्ट्रात कोरोनाच्या विषाणूचा प्रभाव अधिक वाढत आहे. त्यामुळे आता अधिक खबरदारी घेतली जात आहे. तर राज्य सरकारने नवी मार्गदर्शक सुचनांची नियमावली जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यात अंशत: काही गोष्टी सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र नियमांचे पालन करणे अत्यावश्यक असल्याचे ही स्पष्ट करण्यात आले आहे. याच दरम्यान आता नाशिक येथे IT कंपनीचे कर्मचारी आजपासून कामावर पुन्हा रुजू झाले आहेत. मात्र या कर्मचाऱ्यांची स्क्रिनिंगद्वारे तपासणी करण्यात आली आहे. सरकारने ऑफिसेस सुरु करण्याची परवानगी दिली असली तरीही 50 टक्क्यांहून कमी कर्मचारी ऑफिसमध्ये उपस्थिती लावू शकतात असे ही सांगण्यात आले आहे.
राज्यात आजपासून अत्यावश्यक सेवासुविधांसह दारुची दुकाने आणि ऑफिसेस सुरु करण्यात आली आहे. मात्र त्यावेळी नागरिकांनी नियमांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच रेड आणि कंन्टेंटमेंट झोनमध्ये नियम कायम राहणार आहेत. त्यामुळे येथील नागरिकांना फक्त अत्यावश्यक सेवासुविधांचा लाभ घेता येणार आहे. नागपूर येथे आता 17 मे पर्यंत लॉकडाउनचे आदेश कायम राहणार असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. दुसऱ्या बाजूला काही राजकरण्यांनी कोरोनासोबत आता जगायला शिकायला हवे असे ही आपले मत व्यक्त केले आहे.(Coronavirus In Maharashtra: महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात आहेत किती रुग्ण?)
Maharashtra: Employees of an IT company in Nashik are being screened as they rejoin work after their company opens amid #CoronavirusLockdown following revised guidelines issued by the Ministry of Home Affairs. pic.twitter.com/1Vh2OpmhKF
— ANI (@ANI) May 4, 2020
दरम्यान, भारतात कोरोनाबाधितांचा आकडा 42333 वर पोहचला आहे. तर केंद्र सरकारने लॉकडाउनमुळे अडकलेल्या मजूर आणि कामगारांना श्रमिक स्पेशल ट्रेनने आपापल्या राज्यात पाठवण्यात येत आहे. तर महाराष्ट्र सरकारने मजूर आणि कामगारांना घरी पाठवण्यासाठी रेल्वेच्या तिकिटांचे पैसे मागू नये अशी विनंती केली आहे.