
बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण मंडळाने एक दिलासादायक बातमी आहे. यंदा बारावीच्या परिक्षेला बसू इच्छिणार्यांना ऑनलाईन माध्यमातून अर्ज भरण्याची सुविधा देण्यात आली आहे. मात्र काही तांत्रिक बिघाडामुळे काही विद्यार्थ्यांना अडचणी आल्याने पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. मात्र आता शिक्षणमंडळाने ऑनलाईन अर्जासाठी मुदत वाढ दिली आहे.
फेब्रुवारी - मार्च 2019 मध्ये बारावीची परिक्षा देणार्यांना आता 30 ऑक्टोबरपर्यंत प्रवेश अर्ज भरता येणार आहेत. 'सरल डेटाबेस'च्या माध्यमातून अर्ज भरताना काही ज्युनियर कॉलेजेसच्या विद्यार्थ्यांना अडचणी येत होत्या. म्हणून विद्यार्थ्यांना आता ही मुदतवाढ देण्यात आली आहे. ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी 12-17 नोव्हेंबरपर्यंत चलन व शुल्क भरू शकणार आहेत. चलन व शुल्काची यादी ज्युनियर कॉलेज 19 नोव्हेंबरपर्यंत शिक्षण मंडळाकडे सादर करण्यासही मुभा देण्यात आली आहे.
2018-2019 या शैक्षणिक वर्षासाठी बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून तर दहावीची परीक्षा १ मार्चपासून सुरु होणार आहे. SSC, HSC 2019 परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.