Maharashtra Diwali 2020 Bumper Lottery Result: 'महाराष्ट्र दिवाळी भव्यतम सोडत' निकाल lottery.maharashtra.gov.in वर जाहीर; इथे पहा विजेत्यांची यादी
Maharashtra Lottery | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

Maharashtra Diwali 2020 Bumper Lottery Result: दिवाळी सणानिमित्त जाहीर करण्यात आलेल्या लॉटरीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदा दिवाळी बंपर लॉटरीमध्ये (Maharashtra Diwali 2020 Bumper Lottery) महाराष्ट्र राज्य सरकारची 'महाराष्ट्र दिवाळी भव्यतम सोडती'चा निकाल नुकताचं जाहीर करण्यात आला आहे. 'महाराष्ट्र दिवाळी भव्यतम सोडत' निकाल lottery.maharashtra.gov.in वर होणार जाहीर होणार आहे. तुम्हीही महाराष्ट्र दिवाळी भव्यतम सोडत लॉटरीचं तिकीट काढलं असेल तर तुम्ही विजेत्यांच्या यादीत आपलं नाव शोधू शकता. 'महाराष्ट्र दिवाळी भव्यतम सोडत' निकाल पाहण्यासाठी lottery.maharashtra.gov.in वर क्लिक करा.

सरकारच्या lottery.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला हा निकाल पाहता येणार आहे. या दिवसाच्या निमित्ताने पहिले बक्षीस 1 कोटी, दुसरं बक्षीस 5 लाखांची 5 अशी 25 लाख आणि अन्य 10 लाख, 2 लाखाची बक्षीसं जाहीर केली जाणार आहेत. (हेही वाचा - Leopard Attack in Maharashtra: औरंगाबाद येथे बिबट्याच्या हल्ल्यात व्यक्तीसह मुलाचा मृत्यू)

याशिवाय 25 नोव्हेंबरला राजश्री 1000 या लॉटरीचा निकाल लागणार आहे. ही लॉटरी मिझोराम सरकारची आहे. मात्र, महाराष्ट्रातही या लॉटरीच्या तिकीटांची विक्री केली जाते. तुम्ही यासंदर्भात bookmyrajshree.com या वेबसाईटवर अधिक माहिती मिळवू शकता. आज महाराष्ट्र दिवाळी भव्यतम सोडत निकालात विजेता ठरलेल्यांची दिवाळी यंदा नक्कीच खास होणार आहे.