Leopard Attack in Maharashtra: औरंगाबाद येथे बिबट्याच्या हल्ल्यात व्यक्तीसह मुलाचा मृत्यू
Leopard | Representational image (Photo credits: Wikimedia Commons)

Leopard Attack in Maharashtra:  महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे बिबट्याच्या हल्ल्यात एका व्यक्तीसह मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना आपेगाव येथील असून सोमवारी हा प्रकार घडला असून त्यात 52 वर्षीय व्यक्तीसह त्याच्या 27 वर्षीय मुलाचा यामध्ये बळी गेला आहे. हे दोघेजण शेतात काम करत असताना त्यांच्यावर बिबट्याने हल्ल्या केल्याचे वनाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.(मुंबई: आरे मिल्क कॉलनीमध्ये म्हशीच्या गोठ्यात शिरला वाट चुकलेलं बिबट्याचा बछडा; स्थानिकांनी वनात पुन्हा जायला केली मदत!)

शेतात काम करण्यासाठी गेलेले दोघेजण संध्याकाळ पर्यंत घरी परतलेच नाही. त्यामुळे नातेवाईकांनी या दोघांचा शोध घेण्यास सुरुवात केली. तसेच वनाधिकाऱ्यांना ही याबद्दल कळवले. या दोघांचा तपास केला असता अशोक आवटे आणि त्यांचा मुलगा क्रिष्णा यांचा मृतदेह शेतात आढळून आल्याचे सांगण्यात आले आहे.(महाराष्ट्र: नाशिक मधील इंदिरा नगर भागात बिबट्याचा दोघांवर जीवघेणा हल्ला, हे थरारक दृश्य सीसीटीव्हीत कैद, Watch Video)

दरम्यान, वनाधिकाऱ्यांनी बिबट्याला पकडण्यासाठी कॅमेरे लावण्यासह जाळ्याही लावल्या जातील असे म्हटले आहे. तर बिबट्याच्या हल्ल्यात बळी गेलेल्यांच्या परिवाराला कायद्यानुसार आर्थिक मदत सुद्धा केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.