Leopard (Photo Credits: ANI)

लॉकडाऊनमुळे सर्व जनता घरात तर सर्व प्राणी रस्त्यावर दिसू लागल्याचे चित्र अनेक भागात पाहायला मिळत आहे. अशीच काहीशी घटना काल (29 मे) नाशिकमध्ये (Nashik) पाहायला मिळाली आहे. दिवसाढवळ्या एका बिबट्याने (Leopard) रस्त्यावरील दोघांवर जीवघेणा हल्ला केला. या हल्यात हे दोघेही गंभीररित्या जखमी झाले आहेत. वनाधिका-यांच्या म्हणण्यानुसार, या बिबट्यांचे पावलांचे ठसे जंगलात सापडू शकतात. वनविभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली असून अधिक तपास करत आहेत.

नाशिकच्या इंदिरा नगर इतर वेळी ब-यापैकी वर्दळ असते. मात्र सध्या लॉकडाऊन मुळे महाराष्ट्रात अनेक रस्ते ओस पडले आहेत. यामुळे जंगला जवळच्या अनेक भागात वन्य प्राणी रस्त्यावर पाहायला मिळत आहे. हिच संधी साधून काल नाशिकच्या इंदिरा भागात बिबट्याने दोघांवर जीवघेणा हल्ला केला. हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वनविभागाकडून बिबट्याचा शोध सुरु आहे. नाशिकमधील SSK हॉटेलमध्येही या बिबट्याने धुमाकूळ घातल्याचे सांगण्यात येत आहे. Fact Check: मुंबईत सायन ब्रिज किंवा जेव्हीएलआर जवळ बिबट्या आढळला? जाणून घ्या रवीना टंडनने शेअर केलेल्या या व्हायरल व्हिडिओ मागील सत्य

पाहा थरारक व्हिडिओ

काही दिवसांपूर्वी मुंबईच्या (Mumbai) सायन पुला (Sion Bridge) जवळ बिबट्या (Leopard) दिसल्याचा मेसेज व्हॉट्सअ‍ॅप आणि ट्विटरवर व्हायरल होत आहे. काहींनी हा बिबट्या अंधेरीतील जेव्हीएलआर (JVLR) परिसरातील असल्याचे म्हटले होते. मात्र हा व्हिडिओ हैदराबाद चा असून हैदराबादच्या मैलारदेवपल्ली (Mailardevpally) भागात बिबट्या दिसला होता. हे पाहून अधिकाऱ्यांना पाचारण केले असता, ते त्या ठिकाणी पोहोचण्याआधीच बिबट्या तिथून जवळच्या जंगलात पळून गेला.