कोरोना विषाणूच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर अनेक राजकीय नेते राजकारण करत आहेत. मात्र, कोरोनाच्या संकटात राजकारण न करता महाराष्ट्र (Maharashtra) सरकारच्या पाठीशी सर्वांनी उभे राहावे, सहकार्य करावे, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी सर्व राजकीय नेत्यांना केले होते. यावरुन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत. ही राजकारणाची वेळ नाही, सर्वांनी एकत्र येऊन सरकारला सहकार्य करा, हा जो तुम्ही सल्ला दिला आहे, त्याबद्दल आभार. मी मुद्दाम हिंदीत बोललो. मी तुमची तारीफ केली हे वरपर्यंत कळावी म्हणून मुद्दाम हिंदीत बोललो. मी सगळे मोकळेपणाने बोलतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये आज एकोपा आहे. एकोपा असूनही काही जण राजकारणातच गुंतले आहेत. मी याकडे लक्ष देत नाही. ज्यांना राजकारण करायचे आहे, त्यांना करु द्या असेही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
कोरोनाच्या संकटकाळात जसे सर्व जण जातपात, धर्म बाजूला ठेऊन एकत्र येत आहेत. तसे राजकारण न करता सर्वांनी महाराष्ट्र सरकारच्या पाठीशी उभे राहावे, सहकार्य करावे, हे आवाहन केल्याबद्दल नितीन गडकरी यांचे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे यांनी आभार मानले आहेत. केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये आज एकोपा आहे. एकोपा असूनही काही जण राजकारणातच गुंतले आहेत. मी याकडे लक्ष देत नाही. उद्धव ठाकरे यांच्या विधानपरिषद सदस्यत्वावरुन गेले काही दिवस राज्यात मोठे राजकारण रंगले आहे. नितीन गडकरींनी राजकारण न करण्याचा सल्ला देत अप्रत्यक्षपणे राज्यातील भाजप नेत्यांचेच कान उपटले होते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी गडकरींचे आभार मानत विरोधकांनाच उत्तर दिल्याचे बोलले जात आहे. हे देखील वाचा- Coronavirus: लॉकडाउनचे नियम मोडल्याप्रकरणी वाधवान कुटुंबियांचा ताबा CBI कडे- गृहमंत्री अनिल देशमुख
कोरोना विषाणूने संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे. राज्यावर कोरोनाचे संकट असताना विरोधीपक्षातील नेते सत्ताधाऱ्यांनावर टीका करू लागले आहेत. यातच केद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजप पक्षातील नेत्यांची अप्रत्यक्षरित्या कान उघडणी केली आहे. राजकारणापेक्षा विकासकारण आणि राष्ट्रकारण महत्त्वाचे आहे, असे मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. सगळ्या पक्षाच्या संवेदनशील नेत्यांनी ही बाब लक्षात घेतली पाहिजे. देश संकटात असताना आम्ही सगळे एक आहोत, ही भावना अत्यंत महत्त्वाची आहे. तसेच एखादा मुद्दा पटला नसेल तर, त्याबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करा. सध्याची वेळ ही एकजुटीने कोरोनाच्या संकटाचा सामना करण्याची आहे. सध्या देश कोरोनाच्या संकटाशी लढतोय. हे संकट हे देशावरचे सगळ्यात मोठे संकट आहे. या संकटात राजकारण करणे गैर आहे, असेही नितीन गडकरी म्हणाले.