आज सर्वत्र अक्षय्य तृतीया, बसवेश्वरांची जयंती आणि रमजान सारख्या सणांसाठी प्रथम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. कोरोनाचे संकट कोणालाच अपेक्षित नव्हते मात्र आता ही लढाई आपण लढत आहोत. तसेच सर्व धर्मियांचे आभार मानत उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या देशकर्तव्याला सलाम केला आहे. कोरोनाशी लढा देणाऱ्या पोलीस हवालदारांचे निधन झाल्याने महाराष्ट्र सरकारच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पोलीस आपल्यासाठी अहोरात्र मदत आहे त्यामुळे ते आपल्यासाठीच काम करत असल्याचे लक्षात घेणे अत्यावश्यक आहे. लॉकडाउनचा उपयोग हा कोरोनाची लढाई लढण्यात आपण यशस्वी ठरत असल्याचे ही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कोरोनाच्या लढाईत राजकरण न करता महाराष्ट्र सरकारच्या पाठीमागे खंबीर उभे रहावे असे सांगत असल्यायाने त्यांचे धन्यवाद मानले आहेत.
नागरिकांनी गर्दी करु नका आणि रेल्वे सुरु होणार नसल्याचे ही स्पष्ट केले आहे. राज्यात मुभा देण्यात आल्यानंतर नागरिकांनी पुन्हा गर्दी करण्यास सुरुवात केल्याचे दिसून येत आहे. 80 टक्के लोकांमध्ये लक्षणे दिसून आली नाहीत. तर 20 टक्क्यांमध्ये मध्यम, गंभीर स्वरुपाची दिसून येत आहेत. जिल्ह्याअंतर्गत उद्योगधंद्यांना सुरुवात केली आहे पण जिल्ह्यांच्या सीमा बंदच ठेवण्यात आल्या आहेत. तर नॉन-कोविड रुग्णांसाठी दवाखाने, नर्सिंग होम सुरु करण्यात यावेत अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी केले आहे. यासाठी सरकार तुमच्या पाठीशी असणार आहे ते सुद्धा त्यांनी म्हटले आहे. गोरेगाव, वरळी येथे रुग्णांसाठी बेड्सची सोय करण्यात आली आहे. महाराष्ट्रात 18972 चाचण्या केल्या असून 11162 जणांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. फळभाज्या घरपोच करता येईल का याचा सरकारकडून विचार करण्यात येणार आहे. कृषी उद्योग नेहमीप्रमाणेच सुरु राहणार आहेत. प्लाझ्मा थेरपी आणि अन्य विविध मार्गाने प्रयत्न करत आहेत. तर 1 लाखांच्या वरती शिवभोजन थाळ्यांची संख्या गेली आहे. जगभरातून हिंदूस्थानाचे कौतुक केले जात असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटल आहे. (Coranavirus: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा महत्त्वाचा निर्णय; राजस्थानमध्ये अडकलेल्या 2000 विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात परत आणणार)
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून ठोस पावले उचलली जात आहेत. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुरुवातीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात जमावबंदी कायदा लागू केला होता. त्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात 21 दिवसांकरिता संचारबंदी घोषीत केली होती. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन 3 मेपर्यंत संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे.कोरोना विषाणूने संपूर्ण देशात थैमान घातला आहे. त्यामुळे नागरिकांना घरातच थांबून कोरोनाच्या विरोधात लढा द्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. राज्यातील विविध ठिकाणी कोरोनाबाधितांवर डॉक्टर्स, नर्स आणि वैद्यकिय कर्मचारी दिवसरात्र काम करत आहेत. त्यामुळे नागरिकांनी सध्याची कोरोनाची परिस्थिती गांभीर्याने घेत त्यासंबंधित नियमांचे काटेकोर पालन करावे. आपला विश्वास आणि आपले आशिर्वाद हेच आमचे बळ असल्याचे ही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, आज सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात मधून देशातील जनतेशी संवाद साधला. त्यावेळी मोदी यांनी राज्य सरकारची प्रशंसा, महामारीचा सामना करण्यात राज्य सरकारत अत्यंत सक्रिय भुमिका बजावत असल्याचे म्हटले होते. त्याचसोबत स्थानिक प्रशासन, राज्य सरकार ज्या जबाबदाऱ्यांचे पालन करत आहेत त्यांची कोरोनाच्या विरोधातील लढाईत त्यांची भुमिका मोठी आहे. या सर्वांचे परिश्रम अत्यंत प्रशंसनीय असल्याचे ही मोदी यांनी म्हटले आहे.