लॉकडाऊन (Lockdown) काळात राजस्थान (Rajasthan) राज्यात अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना राज्यात परत आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील सरकारने हालचाली सुरु केल्या आहेत. शिक्षणासाठी गेलेल सुमारे 1800 ते 2000 विद्यार्थी राजस्थानातील कोटा (Kota) येथे अडकले आहेत. या विद्यार्थ्यांना परत आणले जावे अशी मागणी वारंवार होत होती. त्यानंतर सरकारने हा निर्णय घेतला. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या नेतृत्वाखालील राजस्थान सरकारशी महाराष्ट्र सरकारची बोलणीही झाली आहेत. दरम्यान, या विद्यार्थ्यांना परत आणल्यानंतर त्यांची तपासणी करुन 14 दिवस त्यांना क्वारंटाईन केले जाणार आहे.
राजस्थानात अडकलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्याशीही चर्चा केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. तसेच, महाराष्ट्र सरकारने तसे एक पत्रही राजस्थान सरकारला पाठवले आहे. या पत्रात राजस्थान येथील कोटामध्ये शिक्षणासाठी गेलेले सुमारे 1800 ते 2000 विद्यार्थी अडकले आहेत. त्यांना महाराष्ट्रात सोडण्यात यावे अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे. हे विद्यार्थी महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांना क्वारंटाईन केले जाईल असेही या पत्रात म्हटले आहे.
Govt of Maharashtra has requested to the Govt of Rajasthan for a safe passage to 1800-2000 students from Maharashtra who are stranded in Kota, Rajasthan to the State. Once they reach back home they will be thoroughly screened&home quarantined for 14 days: Mantralaya Control Room pic.twitter.com/3qQydSpXVA
— ANI (@ANI) April 25, 2020
ट्विट
Govt of Maharashtra has requested to the Govt of Rajasthan for a safe passage to 1800-2000 students from Maharashtra who are stranded in Kota, Rajasthan to the State. Once they reach back home they will be thoroughly screened&home quarantined for 14 days: Mantralaya Control Room pic.twitter.com/3qQydSpXVA
— ANI (@ANI) April 25, 2020
उद्धव ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ''महाराष्ट्र व राजस्थान राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी राजस्थानातील कोटा येथे असलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना परत आणण्याबाबत चर्चा केली होती. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी त्यांचे कार्यालय कार्यरत आहे. अशोक गहलोतजी यांना सहकार्याबद्दल धन्यवाद'' (हेही वाचा, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सूचनेचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून समर्थन)
ट्विट
महाराष्ट्र व राजस्थान राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी राजस्थानातील कोटा येथे असलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना परत आणण्याबाबत चर्चा केली होती. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी त्यांचे कार्यालय कार्यरत आहे. @ashokgehlot51 जी यांना सहकार्याबद्दल धन्यवाद! https://t.co/h6jtUVomLu
— Aaditya Thackeray (@AUThackeray) April 25, 2020
दरम्यान, पर्यटन आणि राजशिष्टाचारमंत्री आदित्य ठाकरे यांनीही ट्विटरद्वारे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोथ यांचे आभार मानले आहेत. आदित्य ठाकरे यांनी ट्वटमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्र व राजस्थान राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी राजस्थानातील कोटा येथे असलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना परत आणण्याबाबत चर्चा केली होती. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी त्यांचे कार्यालय कार्यरत आहे. अशोक गहलोत यांचे या सहकार्याबद्दल धन्यवाद!