Uddhav Thackeray (Photo Credits: CMO Maharashtra)

CM Uddhav Thackeray Facebook Live Updates:बॉम्बे प्रेसिडिएंसीमधून विभक्त होत 1 मे 1960 रोजी महराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांची विभागणी झाली. आज या घटनेला 60 वर्ष पूर्ण झाली पण यंदा महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमावर कोरोनाचं सावट असल्याने मराठी जनतेला घरीच बसूनच महाराष्ट्र दिनाचं सेलिब्रेशन करावं लागलं. पण राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधत जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. एकेकाळी 'ठाकरे' कुटुंबाने संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये भाग घेऊन राज्याच्या निर्मितीमध्ये सहभाग घेतला होता. यंदा मुख्यमंत्री म्हणून हुताम्यांना मानवंदना देताना अंगावर शहारा आल्याचं सांगितलं. रेड झोन, ऑरेंज झोन आणि ग्रीन झोन मध्ये राज्याची विभागणी झाली आहे. मुंबई, नागपूर,पुणे सारख्या भागात लॉकडाऊनला उठवणं शक्य नाही. ऑरेंज झोन मध्ये मर्यादित स्वरूपात शिथिलता येऊ शकते. असे संकेत दिले आहे. दरम्यान महाराष्ट्र  दिनासोबतच त्यांनी जनतेला पडलेल्या लॉकडाऊन बद्दलच्या बंधनांच्या उत्सुकतेलाही उत्तरं दिली आहे. हा लॉकडाऊन म्हणजे कोरोना गतिरोधक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. एव्हढा लॉकडाऊन केला पण त्याचा उपयोग काय झाला असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल पण या लॉकडाऊन मुळेच आपण कोरोनाचा गुणाकार रोखू शकलो असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.  एव्हढा लॉकडाऊन केला पण त्याचा उपयोग काय झाला असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल पण या लॉकडाऊन मुळेच आपण कोरोनाचा गुणाकार रोखू शकलो असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान या वेळेस बीकेसी आणि गोरेगावच्या मैदानावर काही वर्षांपूर्वी आपण महाराष्ट्र  दिनी सांस्कृतिक सोहळ्यांनी सजलेल्या कार्यक्रमांनी विश्वविक्रम केला होता. पण यंदा याच जागी आता कोरोनाशी लढण्यासाठी खास यंत्रणा, क्लिनिक उभी राहिली आहेत. आता पुन्हा आपल्याला कोरोना विरूद्ध चिवट होण्याची गरज आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या संभाषणातील महत्त्वाचे मुद्दे

    • 75 ते 80% लोकांमध्ये सौम्य लक्षणं
    • बीएमसी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या पुन्हा रुग्णसेवेला सलाम
    • कोरोना व्हायरस लॉकडाऊन नव्हे तर हा कोरोनाला गतिरोधकचा काळ होता.
    • कोव्हिड योद्धा ला उत्तम प्रतिसाद
    • रेड झोन, ऑरेंज झोन आणि ग्रीन झोन मध्ये राज्याची विभागणी झाली आहे. मुंबई, नागपूर,पुणे सारख्या भागात लॉकडाऊनला उठवणं शक्य नाही. ऑरेंज झोन मध्ये मर्यादित स्वरूपात शिथिलता येऊ शकते. असे संकेत दिले आहे.
    • महाराष्ट्रात इतर भागांत अडकलेल्यांना जिल्हाधिकार्‍यांशी बोलून स्थलांतराची परवानगी मिळू शकते.
    • आयुष मंत्रालयाच्या सूचनांनुसार होमिओपॅथी, आयुर्वेद डॉक्टरांना काम करण्यासाठी संधी मिळू शकते.

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसची दहशत कायम आहे. राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 10 हजारांच्या पुढे गेली आहे. अशावेळेस नागरिकांना सुरक्षित राहण्याचा सल्ला दिला आहे. आज सकाळी मंत्रालयात अत्यंत साधेपणात महाराष्ट्र दिनाचं सेलिब्रेशन झालं. यावेळेस त्यांनी ध्वजारोहण केलं. राज्यपाल भगतसिंग कोश्यारींचं भेट घेतली.