महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण? या प्रश्नाला आज पूर्णविराम लागला असून राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांयकाळी 6.40 शिवतिर्थावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात आनंदमय वातावरण निर्माण झाले आहे. मुख्यमंत्र्याची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी कुटुंबासह मुंबईतील अराध्य दैवत सिद्धिविनायक मंदिराचे दर्शन घेतले आहे. महाराष्ट्रातील मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर उद्धव ठाकरे विराजमान झाल्यानंतर येत्या काही क्षणातच त्यांच्या नेतृत्वाखाली आज सह्याद्रीवर मंत्रीमंडाळाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत कोणते महत्वाचे निर्णय घेतले जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एएनआयचे ट्वीट-
Mumbai: Maharashtra CM Uddhav Thackeray, along with his wife Rashmi & their son Aaditya Thackeray offer prayers at Siddhivinayak Temple. #Maharashtra pic.twitter.com/54eOi1jgG6
— ANI (@ANI) November 28, 2019