Vijay Wadettiwar On Maharashtra Political: महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी शनिवारी धक्कादायक दावा केला आहे. नागपुरात (Nagpur) पत्रकारांशी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, महाराष्ट्रात जे काही चालले आहे ते योग्य नाही. हे सरकार फार काळ टिकणार नाही. महाराष्ट्रातील मुख्यमंत्रिपद धोक्यात आले आहे. सप्टेंबरपर्यंत राज्याचे मुख्यमंत्री बदलतील.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस हे महाराष्ट्र सरकारमध्ये सत्ताधारी भागीदार आहेत. अजित पवार गेल्या महिन्यात शरद पवारांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसपासून फारकत घेत सरकारमध्ये सहभागी झाले होते.
#WATCH | Vijay Wadettiwar, LoP Maharashtra & Congress leader, says, "What's happening in Maharashtra is not right...This government will not last...There is danger to the main chair (CM) in Maharashtra. I can say there will be a change in the main chair by September..." pic.twitter.com/7qZYrN7RGq
— ANI (@ANI) August 19, 2023
गेल्या महिन्यात सत्ताधारी पक्षाशी हातमिळवणी केल्यानंतर अजित पवार हे दुसरे उपमुख्यमंत्री झाले, तर त्यांच्या आठ त्यांच्या सहकाऱ्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. जून 2022 मध्ये, शिंदे यांनी बंड करून शिवसेनेत फूट पाडल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार पडले. त्यानंतर शिंदे यांनी सर्वोच्च पद काबीज करण्यासाठी भाजपशी युती केली.