Kopardi rape and murder case victim’s sister | X @ANI

महाराष्ट्रामध्ये 2016 साली कोपर्डीत एका मुलीवर झालेल्या सामुहिक बलात्कार आणि हत्येचा प्रकार घडला होता. पुढे या प्रकरणामध्ये आरोपीला फाशी झाली. पण या घटनेचे महाराष्ट्रात तीव्र संताप उठत होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी पीडीतेच्या कुटुंबाला दिलेला शब्द आज त्यांनी पाळल्याचं बघायला मिळालं आहे. पीडीतेचं कुटुंब या दु:खातून सावरताना आता पीडीतेच्या बहिणीचं लग्न झालं आणि या विवाहसोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Maharashtra CM Devendra Fadanvis) हजर होते.

पीडितेच्या बहिणीच्या लग्नाची जबाबदारी आपण स्वत: स्वीकारून लग्नसोहळ्यासाठी उपस्थित राहणार असा शब्द फडणवीसांनी 8 वर्षांपूर्वी दिला होता. काही दिवसांपूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री झालेल्या देवेंद्र फडणवीस यांनी कामाच्या व्यग्रतेमधून वेळ काढत हजेरी लावली. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत आमदार प्रविण दरेकर, सुजय विखे पाटील उपस्थित होते. या लग्नसोहळ्यात प्रविण दरेकर यांनीही मंगलाष्टकं गायली.

प्रविण दरेकर यांची मंगलाष्टकं

कोपर्डी (ता. कर्जत) येथील सुद्रिक कुटुंबातीव मुलीचा विवाह निघोज (ता. पारनेर) येथील वराळ कुटुंबातील मुलाशी झाला आहे. शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथे हा लग्नसोहळा संपन्न झाला.

आजोबांच्या घरी भाजी करण्यासाठी मसाला आणण्यासाठी गेलेल्या मुलीला आरोपींनी रस्त्यात अडवून तिच्यावर अत्याचार केला आणि त्यानंतर तिचा खून करण्यात आला. या प्रकरणानंतरच राज्यात मराठा आरक्षणाचं आंदोलन देखील अधिक टोकदार झालं आहे.