देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून सध्याची परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे एकूणच याचा फटका सर्व क्षेत्रांना बसला आहे. मात्र कोरोनाची परिस्थिती पाहता केंद्र सरकारने येता 3 मे पर्यंत लॉकडाउनचे आदेश कायम ठेवण्यात आले आहेत. तर महाराष्ट्रात सुद्धा कोरोनाबाधितांचा आकडा सर्वाधिक आहे. याच दरम्यान आजपासून मुस्लिम बांधवांच्या रमजानाच्या सणाला आजपासून सुरुवात झाली आहे. राज्यातील सर्व मुस्लिम बांधवांना यंदाचा रमजानचा सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा करता येणार नाही आहे. कारण रमजानवर (Ramadan) कोरोनाचे संकट असून नागरिकांनी घरातच नमाज अदा करावा असे आवाहन करण्यात आले आहे. याच पार्श्वभुमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी राज्यातील मुस्लिम बांधवांना रमजानच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
यंदा रमजानच्या महिन्यात नागरिकांनी सोशल डिस्टंन्सिंगचे काटेकोरपणे पालन करावे आणि घरगुती स्वरुपातच धार्मिक कार्यक्रमाचे करण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे. रमजानच्या महिन्यात मुस्लिम बांधव महिनाभर रोझा ठेवतात. तसेच दिवसातून पाच वेळा नमाज अदा करतात. रमजानच्या पवित्र महिन्यात अल्लाह स्वर्गाचे दरवाजे खुले करतो असे मानले जाते. तसेच प्रत्येकाची इच्छा या काळात कबुल केली जाते असे ही म्हणतात. मात्र कोरोनाचे रमजानवरील सावट पाहता नागरिकांनी घरातच इफ्तार पार्टीचे आयोजन करावे असे ही सांगण्यात आले आहे.(Happy Ramadan 2020 First Roza Wishes: रमजान करिमच्या पहिल्या उपवासानिमित्त WhatsApp Messages, Ramazan GIF Images, SMS पाठवून साजरा करा आजचा दिवस)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील मुस्लिम बांधवांना पवित्र #रमजान महिन्याच्या दिल्या शुभेच्छा. आपण यंदा रमजानच्या महिन्यात #SocialDistancing चे काटेकोरपणे पालन करावे आणि घरगुती स्वरूपातच धार्मिक कार्यक्रम करण्याचे आवाहन. pic.twitter.com/59sOGELI5O
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 24, 2020
रमजान महिना हा मुस्लिम धर्मियांसाठी स्वयंशिस्त, संयम शिकवणारा आहे. या काळात इतरांना त्रास होईल अशा विनाशी विचार, कृतींपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. त्याप्रमाणेच महिनाभर मुस्लिम बांधवांना घालून दिलेल्या नियमांचंही विशेष पालन करायचं असतं. दरवर्षी मुंबईसह देशभरात रमजान महिन्यात स्वादिष्ट पदार्थांची रेलचेल असते. मात्र यंदा घरच्या घरीच रमजान साजरा करण्याचं, रमजान महिन्यातील नियमित नमाज अदा करण्यासाठी मशिदीमध्ये न जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.