Uddhav Thackeray Address to State Today: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री 8.30 वाजता जनतेला संबोधित करणार; लॉकडाऊनच्या निर्बंधात शिथिलता येण्याची शक्यता
CM Uddhav Thackeray | (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्रात (Maharashtra) आलेल्या कोरोनाच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेचा राज्यातील नागरिकांना मोठा फटका बसला आहे. ज्यामुळे राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. सध्या राज्यातील कोरोनाची परिस्थिती सुधारत आहे. याचपार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज रात्री 8.30 वाजता राज्यातील जनतेला संबोधित करणार आहेत. यामुळे उद्धव ठाकरे आज नेमकी काय घोषणा करतात? याकडे सर्व जनतेचे लक्ष लागले आहे. राज्यात 1 जूननंतरही पुढील 15 दिवसांकरिता लॉकडाऊन वाढण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. परंतु, राज्यातील लॉकडाऊनच्या निर्बंधात शिथिलता येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लॉकडाऊन संदर्भात राज्यातील जनतेशी संवाद साधला होता. त्यावेळी राजेश टोपे म्हणाले होते की, राज्यातील विविध जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या अटोक्यात येत आहे. परंतु, काही जिल्ह्यात अजूनही कोरोनाचा प्रादुर्भाव दिसत आहे. यामुळे रेड झोन वगळता राज्यातील अनेक जिल्ह्यात कोरोना निर्बंधांना शिथिलता येण्याची शक्यता असल्याचे त्यांनी म्हटले होते. हे देखील वाचा- Nana Patole On Modi Goverment: 'देशाने स्वातंत्र्यानंतर कमवलेले मोदी सरकारने 7 वर्षात विकायला काढले' काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची टीका

ट्वीट-

महाराष्ट्रात काल (30 मे 2021) 20 हजार 295 कोरोनाबाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. तर, नव्या 31 हजार 964 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात एकूण 53लाख 39 हजार 838 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 2 लाख 76 हजार 573 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 93.46% झाले आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.