महाराष्ट्रात (Maharashtra) आलेल्या कोरोनाच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेचा राज्यातील नागरिकांना मोठा फटका बसला आहे. ज्यामुळे राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. सध्या राज्यातील कोरोनाची परिस्थिती सुधारत आहे. याचपार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज रात्री 8.30 वाजता राज्यातील जनतेला संबोधित करणार आहेत. यामुळे उद्धव ठाकरे आज नेमकी काय घोषणा करतात? याकडे सर्व जनतेचे लक्ष लागले आहे. उद्धव ठाकरे यांचे लाईव्ह (CM Uddhav Thackeray Live) भाषण पाहण्यासाठी खालील माहिती फायदेशीर ठरणार आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. मात्र, आता राज्यातील अनेक ठिकाणी कोरोना अटोक्यात आला आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उद्धव ठाकरे यांचे लाईव्ह भाषण तुम्ही येथे पाहू शकता. हे देखील वाचा- Nana Patole On Modi Goverment: 'देशाने स्वातंत्र्यानंतर कमवलेले मोदी सरकारने 7 वर्षात विकायला काढले' काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची टीका
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे लाईव्ह भाषण येथे पाहा-
महाराष्ट्रात काल (30 मे 2021) 20 हजार 295 कोरोनाबाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. तर, नव्या 31 हजार 964 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात एकूण 53लाख 39 हजार 838 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 2 लाख 76 हजार 573 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 93.46% झाले आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.