CM Uddhav Thackeray With family (PC - PTI)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) मातोश्रीवरून सहकुटुंब अयोध्या दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. आज महाविकास आघाडी सरकारला सत्तेत येऊन 100 वर्ष पूर्ण झाले आहेत. आज उद्धव ठाकरे रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी या विशेष दौऱ्याचे नियोजन केले आहे. आज दुपारी साडेतीन वाजता ते अयोध्येमध्ये येणार आहेत. यासंदर्भात शुक्रवारी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी माहिती दिली होती. सध्या ठाकरे कुटुंबीय मुंबई विमानतळावर दाखल झाले आहेत.

उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबासमवेत अयोध्येला जाणार आहेत. अयोध्या दौऱ्यासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे तसेच सामना वृत्तपत्राच्या संपादक रश्मी ठाकरेही उपस्थित असणार आहेत. अयोध्येत राम लल्लाचे दर्शन झाल्यानंतर उद्धव ठाकरे माध्यमांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर ते मुंबईकडे येणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शरयू नदीवरील महाआरती रद्द केली आहे.

आज महाविकास आघाडी सरकारला सत्तेत येऊन 100 दिवस पूर्ण झाले आहेत. राजकीय विश्लेषकांच्या मते, काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत सत्तेत असलो तरी हिंदुत्त्वाचा मुद्दा आम्ही सोडलेला नाही, हे दाखवून देण्यासाठीच उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याचे नियोजन करण्यात आले आहे.