शरद बोबडे (Photo Credits-ANI)

भारताचे मुख्य न्यायाधीश शरद अरविंद बोबडे यांनी नागपूर मध्ये न्यायिक अधिकारी प्रशिक्षण संस्थेत भारतातील प्रथमच ई-रिसोर्स सेंटर न्याय कौशलचे उद्घाटन केले आहे. न्याय कौशल देशभरात कोणत्याही उच्च न्यायालय आणि जिल्हा न्यायालयात न्यायालयिक प्रकरणांची ई-फिल म्हणजेच ऑनलाईन फायलिंगची सुविधा देणारे आहे. बॉम्बे हायकोर्टाच्या नागपुर खंडपीठाच्या पुनर्निमित ई-रिसोर्स सेंटरचे उद्घाटन केले गेले आहे. या कार्यक्रमात सुप्रीम कोर्टाचे न्यायाशीध भूषण गवई, बॉम्बे हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता यांचा समावेश आहे.

या रिसोर्स केंद्रामधून सर्वोच्च आणि उच्च न्यायालयांमध्ये ई-फायलिंग, ई-सुनावणी केली जाणार आहे. या कार्यक्रमात कोविड प्रोटोकॉलचे सुद्धा पालन करण्यात आले. CJI बोबडे यांनी महाराष्ट्राचे परिवहन विभागासाठी एक वर्च्युअल कोर्टाचे ही उद्घाटन केले. जे ट्रॅफिक फाइन संदर्भातील गोष्टी पाहण्यास सक्षम असणार आहे.(Maharashtra State Cabinet Decision: शिवभोजन थाळीचा दर 31 मार्च 2021 पर्यंत राहणार 5 रुपये; धारावी पुनर्विकासासाठी नव्याने निविदा मागविणार, महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळातील महत्वाचे निर्णय)

हे भारतातील पहिलेच ई-रिसोर्स सेंटर असणार आहे. जे देशभरातील न्यायालयांमध्ये ई-फायलिंगची सुविधा देणार आहे. बॉम्बे हायकोर्टाच्या नागपुर पीठाचे रजिस्ट्रारने एका पत्रकार परिषदेत म्हटले आहे.