कांदा उत्पादकांसाठी राज्य सरकारने 150 कोटी रुपयांची तरतूद केली (Archived, edited, symbolic images)

150 Cr as a Relief to Onion Farmers in Maharashtra  :राज्यातील कांदा उत्पादकांना महाराष्ट्र सरकारने एक दिलासादायक बातमी दिली आहे. सरकारकडून कांदा उत्पादकांसाठी (Onion Farmers) 150 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे.त्यानुसार शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 200 रुपयांचे अनुदान जाहीर झाले आहे. कांद्याचे भाव उत्पादन खर्चापेक्षा कमी मिळत असल्याने देशभरातील शेतकरी पेटला आहे. काही दिवसांपूर्वी याच रागाच्या भरामध्ये संजय साठे नावाच्या एका शेतकर्‍याने पंतप्रधान कार्यालयामध्ये कांदा विक्रीमधून मिळालेले 1064 रूपये मनिऑर्डरच्या स्वरूपात पाठवले होते.  पंतप्रधान मोदींना मनीऑर्डर: संजय साठे यांची PMOकार्यालयाकडून दखल

कांदा उत्पादकांचा हा संताप पाहता राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 150 कोटी रूपयांची तरतूद केल्याची घोषणा केली आहे. कमी किंमतीमध्ये कांदा विकावा लागलेल्या शेतकऱ्यांना 200 रुपये प्रति क्विंटल इतके अनुदान दिले जाणार आहे. 1 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीत कांदा विकणाऱ्या शेतकऱ्यांना हे अनुदान दिले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. हे अनुदान 75 लाख टन कांद्यासाठी असेल. 18 नोव्हेंबरपर्यंतच्या 41. 23 लाख टन आणि 25 डिसेंबर पर्यंतच्या 33. 73 लाख टन कांद्याचा यामध्ये समावेश आहे.