स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव प्रस्तावावरुन राज्य विधिमंडळात वातावरण तापले; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून मोठं विधान; 5 मुद्दे
Deputy Cm Ajit Pawar,Veer Savarkar | (Photo credit: archived, edited, symbolic images)

Maharashtra Vidhan Sabha Budget Session: स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) गौरव प्रस्तावावरुन राज्य विधिमंडळाच्या विधानसभा सभागृहात जोरदार गदारोळ पाहायला मिळाला. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार जोरदार चर्चा झाली. यामुळे विधिमंळाचे वातावरण चांगलेच तापले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधत भाजपने गौरव प्रस्ताव दाखल केला. सभागृह सभापती नाना पटोले (Nana Patole) यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला. या वेळी विरोधी पक्षांनी जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, विरोधकांच्या प्रस्तावावरुन विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar) यांनी 'राज्य, देश उभारणीत ज्यांचं मोलाचं योगदान आहे त्यांचा आदर करावा. चांगल्या व्यक्तीच्या संदर्भात जर एखादी चर्चा येणार असेल तर त्याबाबत कोणालाही आक्षेप घेण्याचं कारण नाही. ज्या व्यक्ती हयात नाहीत अशा व्यक्तींबद्दल अनावश्यक विधानं करून गैरसमज पसवण्याचं काही काम नाही. सावरकरांचं योगदान नाकारता येणार नाही' असे म्हणत मोठं विधान केलं.

'शिदोरी' मासिकावर बंदी घाला - देवेंद्र फडणवीस

सभागृह नेते नाना पटोले यांनी नियमात बसत नसल्याचे कारण देत सावरकर यांच्यावरील गौरव प्रस्ताव नाकारला. या प्रस्तावावरुन सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार शाब्दीक धुमश्चक्री झाली. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी काँग्रेस मुखपत्र 'शिदोरी' मासिकातून सावरकर यांच्याबाबत करण्यात आलेल्या लिखाणाबद्दल तीव्र आक्षेप घेतला. 'शिदोरी' मासिकावर बंदी घालण्याची मागणीही या वेळी देवेंद्र फडणीस यांनी केली. (हेही वाचा, वीर सावरकर यांचा गौरव प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळला; विरोधकांकडून फलक दाखवून निषेध ; 26 फेब्रुवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE)

काही लोक दुसऱ्याच्या डोक्याने चालतात- मुनगंटीवार

देवेंद्र फडणीस यांच्याबाबत लिहिताना, बोलताना काही लोक स्वत:च्या नव्हे तर, दुसऱ्यांच्या डोक्याने चालतात. या लोकांकडे शरीर, मन आणि मेंदू स्वत:चा असतो तरीही हे लोक दुसऱ्याच्या डोक्याने चालतात, असा टोला मुनगंटीवार यांनी विरोधकांना लगावला. यावर आक्षेप घेत आपल्याला जे म्हणायचे आहे ते थेट म्हणा, वक्रोक्तीपूर्ण विधाने टाळा, असे म्हणत अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आक्षेप घेतला.

सावरकरांना भारतरत्न द्या मग चर्चा करु - अनिल परब

सावरकरांच्या गौरव प्रस्तावावर चर्चा करण्यापूर्वी सावरकर यांना केंद्राने भारतरत्न प्रस्ताव द्यावा आणि त्यानंतरच आपण या विषयावर बोलू. त्यांना भारतरत्न देण्याविषयी नितेश राणे यांचे मतही विचारात घ्यावे असा टोला लगावत संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी भाजपची कोंडी केली.

दरम्यान, अजित पवार यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला गेला. विरोधकांनी काय करावं हा त्यांचा अधिकार आहे. आम्हाला सभागृह चालवायचं आहे. सभागृहात काम होणं महत्त्वाचं आहे. काल विरोधक सभागृहात गोंधळ घालत होते परंतु आम्ही एक विधेयक मंजुर करून घेतलं. विधेयक मंजूर होणंही महत्त्वाचं असतं. सभागृह हे नियमाप्रमाणं चालतं. कामकाज सल्लागार समिती असते. सभागृहाचे अध्यक्ष असतात. एखादा विषय घ्यायचा असेल तर ऐनवेळीही घेता येतो. सर्वजण ठरवतील त्याप्रमाणे सभागृहाचं कामकाज चालेल, असंही अजित पवार या वेळी म्हणाले.