राज्यांमधील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणे सक्तीचे असल्याचे विधेयक विधानसभेत आज मंजूर झाले आहे. तर मराठी विषय शाळेत सक्तीचा करण्यात येण्यासाठी राज्य सरकार अग्रेसर होते. बुधवारी शाळेत मराठी विषय सक्तीचा व्हावा यासाठी विधेयक विधानपरिषदेत मांडण्यात आले. त्यानंतर ते विधानपरिषदेत बहुमताने पास झाले होते. एवढेच नाही तर इंग्रजी माध्यमांच्या शाळेत मराठी विषय न शिकवल्यास त्यांना तब्बल एक लाखांचा दंड ठोठावण्यात येणार असल्याचे ही सांगण्यात आले होते.आज महाराष्ट्र अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा चौथा दिवस असून विधानसभेत मराठी भाषा सक्ती विधेयक बहुमताने मंजूर करण्यात आले आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात येण्याच्या शिफारसीवर आता निर्णय एकतमताने घेण्यात आला आहे. तर राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत दिली होती.(इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मराठी विषय अनिवार्य; उल्लंघन केल्यास होणार एक लाखाचा दंड!)
Bill that makes the subject of Marathi language mandatory in all schools of Maharashtra has been passed in the state Assembly today with majority. (file pic) pic.twitter.com/XYlRIlcusj
— ANI (@ANI) February 27, 2020
यापूर्वी सीबीएससी आणि आयसीएसी शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नाही. त्यामुळे कायद्याअंतर्गत बदल करुन मराठी भाषा न शिकवल्यास त्या शाळेवर कारवाई करण्यात यावी असे फडणवीस यांनी स्पष्ट केले होते. तसेच प्रत्येक बोर्डाच्या शाळेत मराठी भाषा शिकवणे अनिवार्य असून ती शिकवावी असे ही फडणवीस यांनी म्हटले होते.