महाविकास आघाडी सरकार आज राज्याचा दुसरा अर्थसंकल्प मांडणार आहेत. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार दुपारी 2 वाजल्यापासून अर्थ संकल्पाच्या वाचनाला सुरूवात करणार आहेत. काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी महाराष्ट्र राज्याचा 2020-21 या वर्षाचा आर्थिक पाहणी अहवाल मांडताना राज्याची अर्थव्यवस्था - 8 टक्के तर देशाची अर्थव्यवस्था -8 टक्क्यांवर जाण्याची शक्यता वर्तवली आहे. दरम्यान कोरोना संकटामुळे यंदा महाराष्ट्राला फटका बसला आहे त्यामुळे आगामी वर्षभरात ही तूट भरून काढण्यासाठी सरकार कोणत्या योजना जाहीर करणार याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे. इथे पहा बजेट मधील महत्त्वाच्या घोषणा .
दरम्यान मागील महिन्याभरापासून पेट्रोल-डिझेलच्या दरात सवलत मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आधीच जनता महागाईने होरपळून गेली आहे. त्यात पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरामुळे जनता त्रस्त झाली आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलवर राज्य सरकारकडून आकारण्यात येणाऱ्या सेसमध्ये थोड्याफार प्रमाणात कपात केली जाऊ शकते अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
अर्थसंकल्प 2021-22 लाईव्ह
मागील वर्षभर महाराष्ट्रावरही कोरोनाचं संकट घोंघावत आहे. सध्या देशात सर्वाधिक कोरोनाबाधितांची संख्या महाराष्ट्रात आहे. जानेवारी महिन्यात देशासह मुंबई मध्येही कोविड 19 लसीकरणाला सुरूवात झाली आहे. मात्र सध्या काही दिवसांपासून पुन्हा रूग्णसंख्या वाढत असल्याने आता लसीकरण मोहिम आणि अन्य बाबतीत काय घोषणा होणार हे पहणं उत्सुकतेचे ठरणार आहे.