नागपूर मेट्रो न्यू प्रकल्प हाती घेणार असे अजित पवार यांनी जाहीर केले आहे. 

 पुण्यात  साखर संग्रहालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याची अजित पवार यांनी माहिती दिली आहे.

राज्यातील 8 प्राचीन मंदिरांचा विकास करण्यात येणार असे  अजित पवार यांनी जाहीर केले आहे. 

पश्चिम द्रुतगती मार्गावर सायकलिंगसाठी वेगळी मार्गिका तयार करण्यात येणार असे अजित पवार यांनी म्हटले आहे. 

मुंबई नेहरु सेंटरसाठी 10 हजार कोटींचा निधी अजित पवार यांनी  अर्थसंकल्प सादर करताना जाहीर केला आहे. 

समृद्धी महामार्गाचे 44 टक्के काम पूर्ण झाल्याची अजित पवार यांनी माहिती दिली आहे. 

सातारा, अमरावती येथे सुद्धा शासकीय मेडिकल महाविद्यालय उभारण्यात येणार असल्याची अजित पवार यांनी घोषणा केली आहे. 

 मिठी नदी प्रकल्पासाठी 400 कोटी रुपयांचा निधी अजित पवार यांच्याकडून जाहीर करण्यात आला आहे. 

 सोलापूरातील बोरामणी विमानतळाचे काम पूर्ण करणार असे अजित पवार यांनी म्हटले आहे. 

रायगड मध्ये कायमस्वरुपी एनडीआरएफची तुकडी तैनात करण्यात येईल असे अजित पवार यांनी जाहीर केले आहे. 

Load More

महाराष्ट्र सरकारचा अर्थसंकल्प विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज सादर केला जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विधानसभा व अर्थ राज्यमंत्री शंबूराद देसाई विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. महाविकास आघाडी सरकारचा हा दुसरा अर्थसंकल्प असणार असून याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. अजित पवार यांनी गेल्या वर्षात 9500 रुपयांच्या तोट्याचे बजेट सादर केले होते. अर्थमंत्र्यांच्या समोर कोरोना व्हायरसचे संकट, कर्जाचा बोझा, सरकारी खजिन्यात कमी असे विविध मुद्दे त्यांच्यासमोर एक मोठे आव्हान आहे.

अजित पवार यांनी रविवारी असे म्हटले की, यंदाच्या वर्षात महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात एक लाख करोड रुपयांनी कमी असू शकते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी असे ही म्हटले की, केंद्र सरकारला 'एक राष्ट्र, एक कर' कार्यक्रमाअंतर्गत या वर्षासाठी महाराष्ट्रासाठी 25 हजार कोटी रुपये देणे अद्याप शिल्लक आहे. परंतु आता पैसे पाठवणे सुरु झाले आहे. परंतु अशा पद्धतीची कमतरता ही भविष्यात होणाऱ्या विकासकार्यांवर प्रभाव टाकू शकते. त्याचसोबत वाढत्या पेट्रोल-डिझेल संदर्भातील कर कमी करण्याबद्दल काही निर्णय सरकार घेणार का याकडे सुद्धा सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

प्राप्त झालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राच्या आर्थिक सर्वेक्षण रिपोर्टमध्ये विकास दरात 8 टक्क्यांनी घट झाल्याचे दिसून आले आहे. असा अंदाज लावला जात आहे की, यंदाचा अर्थसंकल्प हा गाव, गरीब, शेतकरी, महिला आणि तरुणांसदर्भातील असू शकतो. त्याचसोबत या वर्षात महापालिकेच्या निवडणूका सुद्धा पार पडणार आहेत. त्यामुळे हा अर्थसंकल्प हा फार महत्वाचा ठरणार आहे. तसेच कोरोनाच्या रुग्णांचा आकडा पुन्हा एकदा राज्यात वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच कोरोनाच्या परिस्थितीमुळे राज्यातील कोणत्या नव्या योजनांमध्ये कपात केली जाणार हे सुद्धा पहाणे महत्वाचे ठरणार आहे.