Maharashtra Board 10th Result 2021 Date: दहावीचा निकाल 16 जुलैला दुपारी 1 वाजता ऑनलाईन कसा, कुठे पहाल?
Results (Archived, edited, representative images)

महाराष्ट्रात यंदा दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचा बोर्ड परीक्षा जरी रद्द झाल्या असल्या तरीही शिक्षण मंडळाकडून दहावीचा निकाल (Maharashtra Board 10th Result) लावला जाणार आहे. यंदा पहिल्यांदाच अंतर्गत मूल्यमापन पद्धतीने निकाल जाहीर होणार असल्याने पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्येही त्याची कमालीची उत्सुकता आहे. यावर्षी दहावीचा निकाल उद्या म्हणजेच 16 जुलै दिवशी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर केला जाणार आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी त्याबद्दलची माहिती देताना विद्यार्थ्यांना शुभेच्छा देखील दिल्या आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडून उद्या अधिकृत वेबसाईटवर आणि काही थर्ड पार्टी वेबसाईट्सच्या आधारे निकाल पाहता येणार आहे.

दरम्यान यंदा बोर्डाची परीक्षा झालेली नसल्याने 9वीचे मार्क्स 50%, 10वीच्या असाईनमेंट 30% आणि 10वीच्या तोंडीपरीक्षा, प्रोजेक्ट्स 20% अशा फॉर्म्युल्याने अंतिम निकाल लावला जाणार आहे. या निकालानंतर बोर्डाकडून एका सीईटी परीक्षेच्या आधारे 11 वीचे प्रवेश दिले जातील. ही परीक्षा वैकल्पिक असणार आहे. तर अंतर्गत मूल्यमापनाने लावण्यात आलेल्या निकालावर खूष नसणार्‍यांसाठी बोर्डाकडून काही इतर पर्याय देखील समोर ठेवले जाणार आहेत. नक्की वाचा:  11th Std CET Format: 11 वी प्रवेशासाठी सीईटी परिक्षेचा पॅटर्न जाहीर, जाणून Exam बद्दल अधिक माहिती.

दहावीचा निकाल कसा आणि कुठे पहाल?

mahahsscboard.in या MSBSHSE च्या अधिकृत वेबसाईटवर, mahresult.nic.in वर किंवा इतर थर्ड पार्टी साईट्सवर दरवर्षीप्रमाणे यंदाही निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. निकाल पाहण्यासाठी तुम्हांला संकेतस्थळाला भेट देऊन निकालाच्या लिंक वर क्लिक करून  आवश्यक माहिती भरून मार्क्स पाहता येतील. Maharashtra SSC Result 2021: 10वीचा निकाल जाहीर; mahahsscboard.in वर तुमचे मार्क्स कसे पहाल ऑनलाईन?

दहावीची लेखी परीक्षा यंदा 29 एप्रिल 2021 ते 20 मे 2021 या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. पण कोरोनाची दुसरी लाट पाहता ती रद्द करण्यात आली होती.यंदाच्या वर्षी  एकूण 16 लाख 58 हजार 624 विद्यार्थी दहावीच्या परिक्षेस पात्र ठरले. त्यापैकी 9 लाख 9 हजार 931  मुलं असून  7 लाख 48 हजार 693  मुली आहेत. एकूण 8 माध्यमांमधून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा उद्या निकाल लागणार आहे.