महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल 28 मे रोजी जाहीर झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांसह पालकांनाही दहावीच्या निकालाचे वेध लागले आहेत. यंदा लोकसभा निवडणूका असल्यामुळे दहावी, बारावीचे निकाल उशिरा लागतील, अशी चिंता सर्वांना होती. मात्र दहावीच्या शिक्षकांवर निवडणूकांच्या कामांची जबाबदारी सोपवण्यात न आल्याने यंदा निकाल वेळेवर लागतील. 10 जूनच्या आत महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकालही जाहीर केला जाईल. 6 जून रोजी निकाल लागण्याची अधिक शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दहावीचा निकाल तुम्ही ऑनलाईन mahresult.nic.in या अधिकृत वेबसाईटवर चेक करु शकता. तसंच विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी महाराष्ट्र बोर्डाकडून इतर तीन वेबसाईट्सवर देखील निकाल पाहण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
निकाल पाहण्यासाठी इतर वेबसाईट्स:
exametc.com
examresults.net
indiaresults.com
राज्यात यंदा 17 लाख 813 विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. राज्यात एकूण 4 हजार 874 परीक्षा केंद्रांवर 1 मार्च ते 22 मार्च या कालावधीत दहावीची परिक्षा पार पडली.