Representational Image (Photo Credits: File Photo)

Maharashtra Board CET Result 2019: महाराष्ट्र बोर्डाचा 12 वी चा (HSC Result) निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थांना इंजिनियरिंग, मेडिकल आणि औषधशास्त्रातील सीईटी परीक्षेच्या निकालाचे वेध लागले होते. मात्र विद्यार्थी-पालकांची निकालाची प्रतिक्षा संपणार असून महाराष्ट्र बोर्ड सीईटीचा निकाल आज संध्याकाळी 5 वाजता जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना mhtcet2019.mahaonline.gov.in वर हा निकाल ऑनलाईन पाहता येईल. (MHT CET Result 2019: महाराष्ट्र बोर्ड सीईटी चा निकाल जाहीर; mhtcet2019.mahaonline.gov.in वर पहा रिझल्ट)

निकाल ऑनलाईन पाहण्यासाठी काही सोप्या स्टेप्स:

# mhtcet2019.mahaonline.gov.in साईटवर तुम्ही निकाल पाहू शकाल.

# download MAH CET 2019 result अशा टॅबवर क्लिक करा.

# तुम्ही नव्या विंडोवर रिडिरेक्ट व्हाल

# आवश्यक माहिती एन्टर केल्यानंतर तुम्हांला निकाल पाहता येऊ शकतो.

# MAH CET 2019 result ची मेरीट लिस्ट तुम्हांला डाऊनलोड करण्याची सोय आहे.

महाराष्ट्रामध्ये 2 ते 13 मे 2019 दरम्यान सीईटी परीक्षा पार पडली होती. महाराष्ट्रात यंदा 3 लाख 96 हजार विद्यार्थी एमएचटी सीईटी या परीक्षेला बसले होते. हे परीक्षार्थी पीसीएम, पीसीबी आणि पीसीएमबी या गटांमध्ये परीक्षेला सामोरे गेले होते.