MHT CET Result 2019: महाराष्ट्र बोर्ड सीईटी चा निकाल जाहीर; mhtcet2019.mahaonline.gov.in वर पहा रिझल्ट

महाराष्ट्र बोर्ड सीईटीचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे.

MHT CET Result 2019: महाराष्ट्र बोर्ड सीईटी चा निकाल जाहीर; mhtcet2019.mahaonline.gov.in वर पहा रिझल्ट
CET Results 2019 (Photo Credits: Facebook)

Maharashtra Board CET Result 2019: महाराष्ट्र बोर्ड सीईटीचा निकाल आज जाहीर करण्यात आला. 28 मे रोजी महाराष्ट्र बोर्डाचा 12 वी चा (HSC Result) निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थांना इंजिनियरिंग, मेडिकल आणि औषधशास्त्रातील सीईटी परीक्षेच्या निकालाची प्रतिक्षा होती. अखेर आज निकाल लागला असून विद्यार्थ्यांना mhtcet2019.mahaonline.gov.in वर हा निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून संकेतस्थळावर निकाल पाहण्यासाठी उपलब्ध आहेत.

कुठे व कसा पहाल निकाल?

mhtcet2019.mahaonline.gov.in साईटवर तुम्ही निकाल पाहू शकाल.

# download MAH CET 2019 result अशा टॅबवर क्लिक करा.

# तुम्ही नव्या विंडोवर रिडिरेक्ट व्हाल

# आवश्यक माहिती एन्टर केल्यानंतर तुम्हांला निकाल पाहता येऊ शकतो.

# MAH CET 2019 result ची मेरीट लिस्ट तुम्हांला डाऊनलोड करण्याची सोय आहे.

महाराष्ट्रामध्ये 2 ते 13 मे 2019 दरम्यान सीईटी परीक्षा पार पडली होती. महाराष्ट्रात यंदा 3 लाख 96 हजार विद्यार्थी एमएचटी सीईटी या परीक्षेला बसले होते. हे परीक्षार्थी पीसीएम, पीसीबी आणि पीसीएमबी या गटांमध्ये परीक्षेला सामोरे गेले होते.

(The above story first appeared on LatestLY on Jun 04, 2019 11:01 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).