HSC Result 2020 | File Image

Maharashtra HSC Result 2020 Date and Time:  महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल उद्या (16 जुलै ) दिवशी जाहीर होणार आहे. यंदा कोरोना संकटकाळात राज्य शिक्षण मंडळाकडून विद्यार्थ्यांचा निकाल लावण्यास उशिर झाला आहे. मात्र मंडळाने यापूर्वीच सांगितल्याप्रमाणे जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत त्यांचा निकाल लावण्याचा प्रयत्न होता. त्यानुुसार आज मंडळाकडून जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार 16 जुलै दिवशी दुपारी एक वाजता हा निकाल अधिकृत वेबसाईटवर mahresult.nic.in पाहता येणार आहे. मंडळाच्या अधिकृत वेबसाईट सोबत थर्ड पार्टी वेबसाईट्सवरही विद्यार्थ्यांना त्यांची गुणपत्रिका ऑनलाईन पाहता येणार आहे.

ANI Tweet 

12 वीचा निकाल  ऑनलाईन  कसा पहाल ?

  • mahresult.nic.in ही वेबसाईट ओपन करा.
  • अधिकृत वेबसाईटच्या होमपेजवर Latest Announcement Of the HSC Results चा पर्याय दिसेल.
  • त्यानंतर HSC Examination Result 2020 वर क्लिक करा.
  • आता तुम्हांला एका नव्या विंडोवर रिडिरेक्ट केलं जाईल, तिथे तुम्हांला रोल नंबर (Roll Number) आणि आईचं नाव (Mother's Name) टाईप करायचं आहे.
  • त्यापुढे View Result वर क्लिक करा.
  • तुम्ही उत्तीर्ण असाल तर तुम्हांला तुमचा निकाल पाहता येईल.
  • तुमच्या निकालाची प्रिंट आऊट काढण्याची, सेव्ह करण्याची सोय आहे.

महाराष्ट्र बोर्डचा निकाल पाहण्यासाठी वेबसाईट्स

  • mahresult.nic.in,
  • maharashtraeducation.com
  • results.mkcl.org
  • mahahsscboard.maharashtra.gov.in,
  • mahahsscboard.in

मागील वर्षी बारावीचा निकाल 28 मे 2019 दिवशी लागला होता. यंदा राज्यात 9 विभागीय मंडळांमध्ये 18 फेब्रुवारी ते 18 मार्च 2020 दरम्यान सारे पेपर सुरळीत पार पडले आहेत. शिक्षण मंडळाने ऑगस्ट 2019 मध्ये जाहीर केलेल्या नियामांनुसार यंदा 12 वी परीक्षा 650 ऐवजी 600 गुणांची घेतली जाणार आहे. हा नवा नियम शैक्षणिक वर्ष 2019-20 आणि शैक्षणिक वर्ष 2020-21 पासून इयत्ता बारावी साठी लागू करण्यात येईल. सध्या हे अतिरिक्त 50 गुण पर्यावरण शास्त्र विषयास देण्यात येत आहेत.

दरम्यान यंदा बारावीची परीक्षेला सामोरे जाणार्‍यांची संख्या 15 लाख 5 हजार 27 इतकी आहे. दरम्यान यामध्ये 8,43,553 मुलं तर 6,61,325 मुलींचा समावेश असून राज्यात एकून 3036 परीक्षा केंद्रावर परीक्षा पार पडली आहे.