Maharashtra Board 10th 12th Result 2022 Date: इयत्ता दहावी, बारावी बोर्ड परीक्षा निकाल कधी जाहीर होणार? शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली घोषणा
Student | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

इयत्ता दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल (SSC-HSC Result 2022 Date Update) कधी जाहीर होणार? याबाबत समस्त विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि एकूणच शैक्षणिक वर्तुळात उत्सुकता आहे. ही उत्सुकता अधिक ताणून न धरता शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी घोषणा केली आहे. वर्षा गायकवाड यांनी निकालाबातब माहिती देताना सांगितले की, इयत्ता बारावीच्या बोर्ड परीक्षेचा निकाल (SSC Result 2022) पुढच्या आठवड्यात लागणार आहे. तर त्यानंतर अवघ्या 15 दिवसांममध्ये इयत्ता दहावीचा (HSC Result 2022) निकालही जाहीर होईल, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. त्या शिर्डी येथे आयोजित 'काँग्रेस नवसंकल्प कार्यशाळा' या कार्यक्रमात बोलत होत्या.

वर्षा गायकवाड यांनी सांगितले की, इयत्ता दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांच्या निकालाबाबत मला राज्यभरातून अनेकांकडून विचारणा करण्यात आली. फोन, मेसेज आणि सोशल मीडियावरुनही विचारणा झाली. ज्यांना ज्यांना या निकालाबाबत उत्सुकता आहे त्या सर्व पालक, विद्यार्थी, शिक्षण आणि इतर सर्वच घटकांना मी सांगू इच्छिते की, इयत्ता बारावीचा निकाल पुढच्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. आम्ही तसा प्रयत्न करत आहोत. शिवाय याबाबत आम्ही पत्रकार परिषद घेऊन लवकरच माहिती देणार आहोत. इयत्ता बारावीचा निकाल लागला की त्यानंतर पंधराच दिवसांमध्ये इयत्ता बारावी परीक्षांचा निकालही जाहीर केला जाईल. (हेही वाचा, NEET PG Result 2022 Declared: यंदा परीक्षेनंतर 10 दिवसांच्या विक्रमी वेळेत नीट पीजी परीक्षेचा निकाल जाहीर; nbe.edu.in वर पहा मार्क्स)

पालक, विद्यार्थी, शिक्षण आणि एकूणच शैक्षणिक वर्तुळातून नेहमीच इयत्ता दहावी, बारावी बोर्ड परीक्षा निकालांबाबत उत्सुकता असते. त्यामुळे संबंधित मंत्रालय आणि विभागाकडे नेहमीच विचारणा केली जाते. अशा वेळी शालेय शिक्षण मंत्री किंवा राज्याचे बोर्ड अधिकृत माहिती देत असते. वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार लवकच एका पत्रकार परिषदेत निकालाबाबत माहिती दिली जाईल.