NEET PG Result 2022 Declared: यंदा परीक्षेनंतर 10 दिवसांच्या विक्रमी वेळेत नीट पीजी परीक्षेचा निकाल जाहीर; nbe.edu.in वर पहा मार्क्स
Representational Image (Photo Credits: @rawpixel/ unsplash.com)

National Eligibility cum Entrance Test अर्थात NEET PG Result 2022 जाहीर करण्यात आला आहे. नॅशनल बोर्ड ऑफ एज्युकेशन कडून यंदा दहा दिवसांच्या विक्रमी वेळेत निकाल लावला आहे. यावर्षी नीट पीजी परीक्षा 21 मे 2022 दिवशी देशात घेण्यात आली होती. ही परीक्षा पुढे ढकलावी यासाठी विद्यार्थी, पालक आग्रही होते मात्र NBE ने 21 मे दिवशीच परीक्षा घेण्यावर ठाम असल्याचं जाहीर करत परीक्षा घेतली. यंदा नीट पीजी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल अधिकृत वेबसाईट nbe.edu.in वर पाहता येणार आहे.

नीट पीजी 2022 कट ऑफ देखील जारी करण्यात आले आहे. यंदाची मेरीट लिस्ट NBE कडून स्वतंत्रपणे जाहीर केली जाईल. परंतू nbe.edu.in या वेबसाईटवरून 8 जून 2022 पासून किंवा नंतर विद्यार्थ्यांना त्यांचे वैयक्तिक स्कोअरकार्ड डाऊनलोड करता येणार आहे.

नीट पीजी 2022 चा निकाल कसा पहाल?

  • अधिकृत वेबसाईट nbe.edu.in ला भेट द्या.
  • त्यानंतर NEET PG च्या निकालावर क्लिक करा.
  • आता एक नवी विंडो ओपन होईल. त्यामध्ये तुमचा रजिस्ट्रेशन नंबर एंटर करून निकाल पहा.

ऑनलाईन निकाल पाहता येत नसल्यास या लिंकवर पीडीएफ फाईलवर पहा निकाल 

केंद्रीय आरोग्यमंत्री Dr Mansukh Mandaviya यांनी निकाल जाहीर माहिती शेअर करत यशवंतांचं अभिनंदन केले आहे. सोबतच यंदा NBEMS कडून निकाल 10 दिवसांत लावण्याचं मोठं काम पार पाडल्याने त्यांच्याही पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे.