Maharashtra: मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी 9 मार्चला भाजप कडून भव्य मोर्चा काढण्यात येणार- देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis And Nawab Malik

Maharashtra: मनी लॉन्ड्रिंग आणि अंडरवर्ल्ड दाउद इब्राहिम संबंधित प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांना सध्या ईडीकडून अटक करण्यात आली आहे. तर त्यांची 7 मार्च पर्यंत ईडी कोठडी वाढवण्यात आली आहे. तर मुंबई बॉम्बस्फोट घडवून आणणाऱ्यांसोबक जमीनाचा व्यवहार करणाऱ्या नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. अशातच आता विरोधीपक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यामुळेच आता येत्या 9 मार्चला भाजपकडून भव्य मोर्चा काढला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी एक ट्विट केले आहे. त्यांनी असे म्हटले की, मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी 9 मार्च रोजी भाजपातर्फे भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यावेळी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मुंबई भाजपाचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा जी, आशीष शेलार, खा. गोपाळ शेट्टी जी, खा. मनोज कोटक आणि अन्य सहकारी यावेळी उपस्थित होते.(Maharashtra Budget Session 2022: महाराष्ट्र भाजप नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक होणारच, देवेंद्र फडणवीस यांचे पुन्हा सुतोवाच; आज अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापाण्यावरही बहिष्कार)

Tweet:

दरम्यान, नवाब मलिक यांना  ईडीकडून ( झालेल्या अटकेच्या कारवाईविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणीवेळी न्यायालयाने तुर्तास तरी नवाब मलिक यांना कोणताही दिलासा दिला नाही. दरम्यान, याच प्रकरणाची सुनावणी आता येत्या 7 मार्च रोजी होणार आहे. ईडीने आपणास केलेली अटक बेकायदेशीर असल्याचे नवाब मलिक यांचे म्हणने आहे. मलिक यांच्या याचिकेवर उत्तर देण्यासाठी ईडीने न्यायालयाकडे वेळ मागितला आहे.