महाराष्ट्र: राज्यात Remdesivir चा काळाबाजार होण्यासह रुग्णांवर मृत्यू ओढावत असल्याने औषध मोफत उपलब्ध करुन द्यावे; देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना (Archived, edited, images)

महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसागणिक झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. परंतु गेल्या काही दिवसात कोविडच्या रुग्णांसाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांचा काळाबाजार केला जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्याचसोबत रुग्णांचा औषधांच्या अभावी मृत्यू होत आहे. याच पार्श्वभुमीवर आता भाजप पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्दव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात फडवणीस यांनी राज्यातील रेमिडेसिव्हर (Remdesivir) इंजेक्शनचा होणारा काळाबाजार सुरु आहे. आधीच राज्यात या औषधाची टंचाई आहे. ऐवढेच नाही तर गरीबांना औषधांचा पुरवठा होत नसल्याने त्यांच्यावर मृत्यू ओढावत आहे. तसेच रेमिडेसिव्हर हे औषध रुग्णांना मोफत औषध उपलब्ध करावे अशी विनंती पत्राद्वारे केली आहे.(Reliance ने विकसित केली कोरोना व्हायरस चाचणीसाठी RT-PCR Kit; अवघ्या 2 तासांमध्ये मिळणार रिझल्ट)

पत्रात फडवणीस यांनी असे म्हटले आहे की, राज्यात जवळजवळ प्रत्येक दिवशी 20 हजार कोरोनाच्या रुग्णांची भर पडत आहे. रुग्णांचा आकडा वाढण्यासह मृतांची संख्या ही वाढत आहे. कोरोनाच्या रुग्णांवर रेमिडेसिव्हर हे औषध फार महत्वाचे आहे. त्यामुळे या औषधांचा पुरवठा योग्य पद्धतीने होईल हे ठरविले पाहिजे. मात्र अनेक जिल्ह्यात रेमिडेसिव्हर औषध उपलब्ध नाही आहे. पुढे फडणवीस यांनी असे ही म्हटले की, राज्य सरकार कडून रेमिडेसिव्हर औषधांचाी टंचाई नसल्याचे सांगितले जात आहे. पण रुग्णांना त्याच्या विरुद्ध सांगितले जात आहे. रेमिडेसिव्हरच्या औषधाची किंमत अधिक असून ते सामान्यांना खरेदी करणे शक्य नाही. अशातच त्यांच्यावर मृत्यू ओढावत आहे.(Nitin Gadkari Recovers From COVID19: केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांची कोरानावर मात)

दरम्यान,काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने रेमिडेसिव्हर औषधांच्या 72 हजार बाटल्या मागवल्याचे म्हटले होते. त्यामुळे आता या औषधांचा तुवटडा होणार नसून सर्व रुग्णांलयांना त्याचा पुरवठा केला जाईल असे स्पष्ट करण्यात आले होते. त्याचसोबत आतापर्यंत 10 हजार रेमिडेसिव्हरच्या बाटल्या मिळाल्याचे ही त्यांनी सांगितले होते.