महाराष्ट्र केसरी 2022 विजेता (Maharashtra Kesari 2022 Winner) ठरलेल्या पृथ्वीराज पाटील (Prithviraj Patil) वर कौतुकाचा वर्षाव होत असताना आता भारतीय जनता पक्षाने त्याला 5 लाखाचं रोख बक्षीस जाहीर केले आहे. आज देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी त्याची घोषणा केली आहे. सोबतच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) पृथ्वीराजचा सत्कार करणार असल्याचंही त्यांनी जाहीर केले आहे.
पृथ्वीराजच्या विजयाने तब्बल 25 वर्षांनंतर महाराष्ट्र केसरी ची मानाची गदा कोल्हापूरात परत आली आहे. मात्र काल पृथ्वीराजला कोणत्याही प्रकारचे रोख बक्षीस देण्यात आले नाही यावरून अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटील ने मुंबईच्या प्रकाश बनकर वर मात करून महाराष्ट्र केसरीचा किताब पटाकवला आहे. 19 वर्षीय पृथ्वीराज हा एका शेतकरी कुटूंबातून वर आला आहे. हे देखील नक्की वाचा: Maharashtra Kesari Final 2022 Winner: पृथ्वीराज पाटील याला खांद्यावर कुस्तीप्रेमींचा जल्लोष, दोन दशकानंतर कोल्हापूरच्या पैलवानने पटकावली मानाची गदा (Watch Video).
25 वर्षानंतर महाराष्ट्र केसरी खिताब कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटील यांना मिळाला आहे.
भाजपतर्फे त्यांचा सत्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांना 5 लाख रुपये पुढच्या सरावासाठी देण्याचा निर्णय सुद्धा भाजपाने घेतला आहे: देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis
— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) April 10, 2022
आज देवेंद्र फडणवीस हे कोल्हापूरच्या पोटनिवडणूकीसाठी शहरात आले आहे. या पोटनिवडणूकीसाठी भाजपाने सत्यजित कदम यांना तिकीट दिले आहे. त्यांच्या प्रचारार्थ सध्या फडणवीस कोल्हापूरात आहेत.