Maharashtra Bhushan: जेष्ठ गायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर
Asha Bhosale | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

जेष्ठ आणि चतुरस्त्र गायिका आशा भोसले (Asha Bhosale) यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award) देऊन गौरविण्यात आले आहे. पुरस्कार समितीच्या आज (25 मार्च) झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. आशा भोसले (Veteran Singer Asha Bhosale) यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी राज्य सरकारचे अभिनंदन केले आहे. प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, उषा मंगेशकर, सुरेश वाडकर यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. दरम्यान, आशा मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी हा पुरस्कार या आधीच मिळायला हवा होता, अशी भावनाही या वेळी व्यक्त केली.

शरद पवार यांनी अशा भोसले यांच्याविषयी कौतुकोद्गार काढताना म्हटले की, आशा भोसले या एक चसुरस्त्र गायीका आहेत. त्यांच्या भगीनी लता मंगेशकर या खूप मोठ्या गायिका आहेत. असे म्हटले जाते की मोठ्या झाडाच्या खाली छोटे झाड वाढत नाही. परंतू, आशाताईंनी हे चुकीचे ठरवले. लता मंगेशकर यांच्यासारख्या मोठ्या गायक भगिणी घरातच असताना त्यांनी आपले गाणे जपले. अत्यंत कठीण आणि विविध प्रकारातली गाणी त्यांनी गायली. त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे आभार, अशा शब्दात शरद पवार यांनी भावना व्यक्त केल्या.

आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाल्याचे ऐकूण फार आनंद झाला. खरे तर हा पुरस्कार त्यांना या आधीच मिळायला हवा होता. परंतू, ठिक आहे. ही खूप आनंदाची बातमी आहे, अशा शब्दात आशा भोसले यांच्या भगिणी उषा मंगेशकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

दरम्यान, सुरेश वाडकर यांनीही आशा भोसले यांना हा पुरस्कार या आधीच मिळायला हवा होता. परंतू, असो.. कधी काधी कळत नाही देव आणि नियतीच्या मनात काय असते. काही गोष्टींना उशीर होतो. त्यांच्या गाण्याने अनेकांना मंत्रमुग्ध केले. आमच्या सारख्या अनेकांना त्यांच्या गाण्याने स्फूर्थी दिली असेही वाडकर म्हणाले

आशा भोसले यांचा जन्म 8 सप्टेंबर 1933 या दिवशी झाला. त्यांनी पार्श्वगायन आणि गायनातील विविध प्रकारांमध्ये अतुलनीय कामगिरी केली आहे. त्या लता मंगेशकर यांच्या छोटी बहिणी आणि दिनानात मंगेशकर यांच्या कन्या आहेत. त्यांनी आजवर विविध चित्रपट आणि इतर अशी मिळून 16 हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. त्यांनी मराठी, हिंदी, बंगाली, गुजराती,पंजाबी, भोजपुरी, तमिल, मलयालम, इंग्रजी, रशीयन अशा विविध भाषांमध्ये गाणी गायली आहेत. आशा भोसले यांनी आपले पहिले गाणे 1948 मध्ये सावन आया या चित्रपटासाठी गायल्याचे सांगितले जाते.