Vaccine | Representational Image | (Photo credits: Flickr)

Maharashtra:  पावसाळा सुरु होण्यापूर्वी सर्व लहान मुलांना इन्फ्लूएन्झाची लस द्यावी असा सल्ला कोविड आणि पीडियाट्रिक टास्कफोर्सने महाराष्ट्र सरकारला दिला आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या दोन्ही टास्कफोर्सने सांगत असे ही म्हटले की, इन्फ्लूएन्झाची लस दिल्यास या आजाराचा प्रादुर्भाव होण्यापासून रोखता येईल. त्याचसोबत रुग्णालयावरील ताण सुद्धा कमी होईल असे ही त्यांना सांगण्यात आले आहे. याबद्दल Times Of India यांनी आपल्या वृत्तात म्हटले आहे.

इन्फ्ल्यूएन्झाच्या लसीचे डोस मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. परंतु त्याच्या एका डोसची किंमत जवळजवळ 1500 ते 2000 रुपये आहे. यावरुन कोविड टास्कफोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांनी उद्धव ठाकरे यांना म्हटले की, इन्फ्लुएन्झाची लस तातडीने सर्व लहान मुलांना ही लस द्यावी. परंतु लसीची किंमत ही थोडी अधिक असल्याने ती मध्यम ते उच्च वर्गातील लोकांना परवडणारी आहे. त्यामुळे राज्य पातळीवर येत्या सहा महिन्यांत प्रत्येक मुलाला द्यावी. या व्यतिरिक्त लसीच्या किंमतीत घट करण्याचा सुद्धा विचार करावा असे ही डॉक्टरांनी म्हटले.

तसेच पीडियाट्रिक टास्कफोर्सच्या प्रमुखांनी सुद्धा कोविड टास्कफोर्सच्या मतासोबत सहमती दर्शवली आहे. यावर उद्धव ठाकरे यांनी या बद्दल विचार केला जाईल असे सांगितले आहे. तसेच लक्षणविरहित कोविड पॉझिटिव्ह असलेल्या मुलांना ही लस देऊ शकत नाही याबद्दल अधिक स्पष्टता हवी. त्याबद्दल टास्कफोर्सने मार्गदर्शन करावे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.(Mumbai Corona Cases: मुंबईतील कोरोनाची परिस्थिती कशी आहे? येथे पाहा आठवड्याभराची संपूर्ण आकडेवारी)

दरम्यान, पीडियाट्रिक टास्कफोर्सचे सदस्य डॉ. येवले यांनी असे म्हटले की, फ्लू हा सुद्धा आजाराच आहे. त्यामुळे ही लस पाच वर्षापेक्षा कमी वय असलेल्या मुलांना दिली जाते. तसेच लसीमुळे श्वसनासंबंधित आजार रोखण्यास मदत होईल असे ही येवले यांनी स्पष्ट केले.  ज्या मुलांना नियमित लसीकरणात डोस राहिला असेल त्यांनी तो घ्यावा. परंतु कोविडची लक्षणे दिसल्यानंतर चार आठवड्यांनी बीसीजी, गोवर, रुबेला किंवा कोण्याती लसीचे डोस घ्यायचे राहिले असल्यास ते सुद्धा घ्यावे असे ही सांगण्यात आले आहे.