CAA and NRC Protest | Representative Image (Photo Credits: IANS)

परभणी येथील पालम नगरपरिषदचे नगराध्यक्ष बाळासाहेब गणेश रोकडे व सेलू नगर परिषदेचे नगराध्यक्ष विनोद हरीभाऊ बोराडे यांनी CAA विरोधात नगरपरिषदेत ठराव केल्यामुळे त्यांना भारतीय जनता पक्षातून काढून टाकण्यात आलं आहे. दरम्यान याबाबतची अधिकृत घोषणा भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. दोघांनाही पक्षाकडून लेखी स्वरूपात देण्यात आलेल्या माहितीमध्ये केंद्र सरकार म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जाऊन त्यांनी हा निर्णय घेतल्याने भाजपा पक्षाकडून त्यांच्याविरोधात कडक कारवाई करण्यात आली आहे. परभणी: भाजपप्रणित सेलू नगरपालिका परिषदेकडून नागरिकत्व सुधारणा कायदा, एनआरसीच्या विरोधात ठराव मंजूर.  

महाराष्ट्रात परभणी जिल्ह्यात भाजपप्रणित सेलू नगरपरिषदेत नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) आणि एनआरसीच्या (NRC) विरोधात ठराव मंजूर करण्यात आला आहे. नगरपरिषदेत तीन नामनिर्देशित सदस्यांसह 27 नगरसेवक आहेत. दरम्यान नगरपरिषदेमध्ये हा ठराव बिनविरोधात 28 फेब्रुवारीला मंजूर करण्यात आला आहे. स्थानिक जनता, जनप्रतिनिधी यांनी सुद्धा याचे समर्थन केले आहे. CAA: नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला मुस्लिम बांधव का करत आहेत विरोध?

केंद्र सरकार मध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत डिसेंबर 2019 ला संसदेत मान्यता देण्यात आली आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्यानुसार, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांग्लादेशातील 31 डिसेंबर 2014 पूर्वी आलेल्याआणि गैर मुस्लिमांना भारतात नागरिकत्व देण्यात येणार आहे. हा कायदा लागू झाल्यास देशातील बहुसंख्य ठिकाणी याचा विरोध करण्यात आला. केंद्रातील भाजपनच्या सरकारने कोणत्याही नागरिकाचे नागरिकत्व हिरावून घेतले जाणार नाही असे वारंवार सांगितले तरीही विरोध कायम सुरुच होता.