महाराष्ट्र विधानसभा निवडणूक (Maharshtra Assembly Elections) पश्चात आज,(16 डिसेंबर) पासून पहिले वाहिले हिवाळी अधिवेशन (Winter Session) नागपूर (Nagpur) येथे सुरु झाले आहे, यावेळी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजप आमदारांनी केलेल्या एंट्रीची खास चर्चा आहे. फडणवीस यांच्या सहित या नेते मंडळींनी डोक्यावर भगव्या रंगाची 'मी पण सावरकर' लिखित टोपी घालून विधानभवनात प्रवेश केला होता. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी वीर सावरकर (V.D. Savarakar) यांच्याविषयी आक्षेपार्ह्य विधान करत माफी मागण्यासाठी मी काही राहुल सावरकर नाही असे म्हंटले होते. यानंतर राजकीय वर्तुळात सुरु असणाऱ्या वादाचे रूपक म्ह्णून आज ही टोपी घालून अधिवेशनाला आल्याचे भाजप आमदारांनी सांगितले आहे.
प्राप्त माहितीनुसार, राहुल गांधी यांच्या विधानाचा निषेध करत काल, म्हणजेच विधानसभा अधिवेशनाच्या पूर्व संध्येला देखील फडणवीस यांच्यासहित अन्य आमदारांनी औपचारिक चहापान कार्यक्रमाला अनुपस्थिती दर्शवली होती, तर आज या टोपीच्या माध्यमातून हा निषेध नोंदवला जात आहे. (नागपूर: महाराष्ट्र विधानसभा हिवाळी अधिवेशनात शेतकरी ते वीर सावरकर यांच्या पर्यंत अनेक मुद्द्यांवरून चर्चेची शक्यता)
ANI ट्विट
Nagpur: BJP MLAs including former Chief Minister Devendra Fadnavis arrive for assembly's winter session wearing 'I am Savarkar' caps https://t.co/wNyohx585c pic.twitter.com/ZAtmdoglDx
— ANI (@ANI) December 16, 2019
दरम्यान, भाजप आणि शिवसेना एकत्र अस्तित्वात असताना हिंदुत्व आणि वीर सावरकर हे नेहमीच महायुतीच्या एकमताचे प्रदर्शन करणारे विषय ठरले होते, पण आता सेनेनं भाजपची कास असून थेट विरुद्ध विचारसरणीच्या महाविकास आघाडीची सोबत स्वीकारली आहे. मात्र जरी राजकीय गरजेसाठी विरुद्ध विचारसरणीची हातमिळवणी केली असली तरी राष्ट्रीय महात्म्यांचा असा अपमान अयोग्य आहे, आणि अशा लोकांसमोर शिवसेना झुकली आहे अशा आशयाचा टोला फडणवीस यांनी काल लगावला होता. तर आम्ही वाचन पाळणारी लोक आहोत आम्ही सावरकर यांचा अपमान खपवून घेणार नाही अशी गावही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली होती.