महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीला सुरुवात झाली आहे. मात्र निवडणूक आयोग आणि अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेल्या मतदार यादी अद्याप गोंधळ कायम असल्याचे दिसून आले आहे. तर मतदारयादी मध्ये मृत किंवा स्थलांतरिक केलेल्यांची नावेच गायब आहेत. या गोंधळाचा परिणाम मतदानावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच काही मतदारांची नावे चुकीच्या पद्धतीने लिहिल्याने त्यांना मतदान करता येणार की नाही असा संभ्रम निर्माण झाला आहे. एवढेच नाही काही मतदारांना वोटर स्लिप सुद्धा अद्याप मिळालेली नाही आहे. तर शिवाजी नगर येथील विद्या भवन शाळेत मतदानाला सुरुवात झाल्यावर वीज गायब झाली आहे. विजेअभावी मतदान थांबू नये म्हणून चक्क मेणबत्तीच्या प्रकाशात मतदान सुरु आहे. तर वर्धा येथील हिंगणघाट मतदासंघामध्ये तांत्रिक बिघाडामुळे गेले 1 तास EVM बंद आहे.
महाराष्ट्रात मतदारांची संख्या 8.9 करोड आहे. त्यामधील 4.6 करोड पुरुष आणि 4.2 महिला मतदारांचा समावेश आहे. त्याचसोबत 2,643 मतदार हे तृतीयपंथी आहेत.मतदान करणाऱ्या मतदारांचे नाव हे मतदार यादीत सहभागी केलेले असते. तसेच मतदाराबाबत त्याचे नाव, पत्ता आणि लिंगसह माहिती आणि कोणत्या विभागील आहे त्याची माहिती दिलेली असते.(महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 Live Updates: पहिल्या 1 तासात 6 टक्के मतदान, आमीर खानसह अनेक सेलेब्जने केले मतदान)
विधानसभा निवडणूकीचा निकाल येत्या 24 ऑक्टोबरला जाहीर केला जाणार आहे.विधानसभा निवडणूक मतदानाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी याकरिता राज्यात पोलीस कर्मचाऱ्यांना तैनात ठेवण्यात आले आहे, तसेच मतदानाच्या दोन दिवस आधीपासून मद्य विक्री बंद ठेवण्यात आली असल्याने अतिउत्साही कार्यकर्त्यांवर चाप बसवण्यात आला आहे. याच प्रमाणे 9000 हुन अधिक मतदान केंद्राच्या परिसरात लाईव्ह वेबकास्टिंगची सोय करण्यात आली आहे.