Trees Cut For Pm Narendra Modi Rally | (Photo credit: Archived, edited, representative images)

Maharashtra Assembly Elections 2019: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांच्या जाहीर सभेसाठी पुणे शहरातील प्रसिद्ध अशा एसपी कॉलेज श्र(Sir Parashurambhau College) परिसरातील असंख्य झाडांची कत्तल करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या गुरुवारी (18 ऑक्टोबर 2019) पुणे येथे सभा घेत आहे. ही सभा पार पाडण्यासाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे. ही तयारी करत असतानाच सभेसाठी अडथळा ठरणारी सर्व झाडे कापून काढण्यात आली आहेत. तसेच, झाडे कापल्यानंतर त्या ठिकाणच्या जमीनीचेही तातडीने सपाटीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे पंतप्रधानांच्या सभेसाठी झाडांचा बळी दिला जात आहे, अशी टिका आता होऊ लागली आहे.

प्राप्त माहितीनुसार, पुण्यातील एसपी कॉलेज मैदानावर असलेल्या अनेक झाडांपैकी अडथळा ठरणारी अनेक झाडं कापून काढण्यात आली आहेत. ही झाडं सुरक्षेसाठी अडथळा ठरत होती. त्यामुळे कापल्याचे आयोजकांनी म्हटले आहे. (हेही वाचा, नाशिक शिवसेना पक्षात असंतोष, युतीला धक्का; 36 नगरसेवक, 350 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा)

पंतप्रधन नरेंद्र मोदी यांचा दिवसभारातील कार्यक्रम

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात गुरुवारी दाखल होतील.
  • भाजप उमेदवार असलेल्या पंकजा मुंडे यांच्या परळी विधानसभा मतदारसंघात त्यांची पहिली सभा पार पडेल.
  • नरेंद्र मोदी यांची दुसरी सभा सातारा येथे पार पडेल.
  • त्यानंतर सायंकाळी 5.30 वाजता पुणे येथे एसपी कॉलेज प्रांगणात मोदींची सभा.
  • शुक्रवारी १८ तारखेला मुंबईत सभा घेत नरेंद्र मोदी भाजप प्रचाराची सांगता करतील.

दरम्यान, या वेळी विधानसभा निवडणूक प्रक्रियेत महाराष्ट्रात 8 कोटी 94 लाख मतदार मतदान करतील. महाराष्ट्रात 288 मतारसंघासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडेल. 27 सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. 4 ऑक्टोबर हा निवडणूक अर्ज दाखल करण्यासाठी अंतिम दिवस असेल. 7 ऑक्टोबर पर्यंत दाखल केलेले आणि छाननीमध्ये टिकलेले उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. त्यानंतर 21 ऑक्टोबर या दिवशी प्रत्यक्ष मतदान तर, 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे.