विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर पुन्हा राष्ट्रवादी पक्षाला धक्का, संजय दिना पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश
संजय दिना पाटील (Photo Credits-Facebook)

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक (Maharashtra Assembly Elections) येत्या 21 ऑक्टोंबरला पार पडणार आहेत. मात्र निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर अद्याप राष्ट्रवादी-काँग्रेस (NCP-Congress) आघाडीतील नेतेमंडळींची शिवसेना (Shiv Sena)-भाजप (BJP) युती मध्ये इनकमिंग सुरुच आहे. तर आता राष्ट्रवादीला पुन्हा एक मोठा धक्का बसला असून इशान्य मुंबईतील राष्ट्रवादीचे माजी खासदार संजय दिना पाटील (Sanjay Dina Patil) यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

संजय दिना पाटील यांच्या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेला मोठे पाठबळ मिळणार आहे. मानखुर्द-शिवाजीनगर मतदारसंघातून संजय पाटील यांच्यामुळे पक्षाला फायदा होण्याची शक्यता आहे. तर लोकसभा निवडणूकवेळी संजय पाटील यांना याच मतदारसंघातून जास्त मत मिळवून विजय झाला होता. मात्र विधानसभा निवडणूकीसाठी शिवसेनेने मानखुर्द येथून विठ्ठल लोकरे यांना रिंगणात उतरवले आहे. तर दुसऱ्या बाजूला लोकरे यांना टक्कर देण्यासाठी रिपाई कडून गौतम सोनावणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

संजय पाटील यांनी 2009 मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून इशान्य मुंबईच्या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. तसेच 15 व्या लोकसभेत पाटील यांना दणदणीत विजय होत त्यांनी खासदारकीचे पद मिळवले होते. मात्र 2014 मध्ये मोदी सरकारमुळे पाटील यांचा पराभव झाला. तसेच लोकसभा निवडणूकीवेळी भाजपच्या मनोज कोटक यांनी पाटील यांना पराभूत केले होते.(एकाच मतदारसंघात आघाडीचे दोन उमेदवार; राष्ट्रवादी काँग्रेसचे भारत भालके, काँग्रेसकडून शिवाजीराव काळुंगे रिंगणात)

राष्ट्रवादीतून यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेत गेलेल्या नेत्यांची यादी काही कमी नाही. यापूर्वी राष्ट्रवादीचे पांडुरंग बरोरा, सचिन अहिर, जयदत्त क्षीरसागर, रश्मी बागल, दिपील सोपल या दिग्गजांनी सेनेत प्रवेश केला आहे. मात्र आता संजय दिना पाटील यांच्या शिवसेना प्रवेशामुळे शरद पवार यांना मोठा धक्का बसणार आहे.