Narendra Modi (Photo Credits: Twitter)

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 च्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज (16 ऑक्टोबर) महाराष्ट्र दौर्‍यावर येणार आहेत. अवघ्या काही दिवसांवर विधानसभेची निवडणूक येऊन ठेपली आहे. त्यामुळे सारेच राजकीय पक्ष उमेदवारांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. आज नरेंद्र मोदी पनवेल, डोंबिवली, पेण, ऐरोली, बेलापूर मतदार संघामध्ये आज प्रचार सभा घेणार आहेत. पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी एसपी कॉलेज परिसरातील झाडांची कत्तल; सुरक्षेच्या कारणावरुन वृक्षतोड

नवी मुंबईमधील खारघर मतदारसंघात सेक्टर 29 मध्ये सेंट्रल पार्क मध्ये दुपारी 2 च्या सुमारास मोदी सभेला संबोधित करणार आहेत. या सभेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणावीस, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्यासह पनवेल विधानसभा क्षेत्राचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर, रायगडचे पालकमंत्री आणि डोंबिवलीचे उमेदवार रवींद्र चव्हाण, पेणचे उमेदवार रवी पाटील, ऐरोलीचे उमेदवार गणेश नाईक आणि बेलापूरच्या उमेदवार मंदा म्हात्रे उपस्थित राहणार आहेत.

ANI Tweet  

महाराष्ट्रात 288 विधानसभा मतदार संघांमध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. हे मतदान 21 ऑक्टोबर दिवशी पार पडणार आहे तर 24 ऑक्टोबर दिवशी मतमोजणी पार पडणार आहे. सध्या अस्तित्त्वात असलेल्या विधानसभेचा कार्यकाल 9 नोव्हेंबरला संपणार आहे.