PM Narendra Modi (Photo Credits-ANI)

Maharashtra Assembly Elections 2019: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज (13 ऑक्टोंबर) महाराष्ट्रात दौऱ्यावर आले असून जळगाव (Jalgaon)  येथे आले. त्यावेळी आयोजित केलेल्या जनसभेला संबोधित करताना प्रथम मोदी यांनी मराठीत संवाद साधला. त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी कलम 370 वरुन आव्हान दिले. केंद्र सरकारने जम्मू-कश्मीर मधून कलम 370 हटवल्यानंतर त्यावर टीका करणाऱ्या विरोधाकांवर मोदी यांनी निशाणा साधला. त्यावेळी मोदी यांनी असे म्हटले की, जम्मू-कश्मीर आणि लद्दाख हा केवळ एक जमिनीचा तुकडा नसून भारताचा ताज आहे. तसेच विरोधांना मी आव्हान देतो की त्यांच्या जाहीरनाम्यात कलम 370 पुन्हा एकदा आणून दाखवावा. नाहीतर या मुद्द्यावरुन मगरीसारखे अश्रू वाहणे थांबवा असा टोला विरोधकांना लगावला.

तसेच रॅलीला संबोधताना मोदी यांनी भारताच्या हिताबाबत घेतलेल्या निर्णयाचा विरोध करणाऱ्या काही राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांचे दुर्दैव असल्याचे म्हटले आहे. तसेच विरोधक शेजारच्या देशाच्या धर्तीवर कलम 370 बाबत बोलत आहेत. 5 ऑगस्टला लोकांच्या भावनांनुसार सरकारने एक अभुतपूर्व निर्णय घेतला. त्याबाबत प्रथम विचार करणे अशक्य वाटते. जम्मू-कश्मीर येथे अशी स्थिती होती की, तेथील लोकांचा विकास कधीन न होण्यासारखा होता. परंतु कलम 370 हटवल्यानंतर आता सर्वत्र एकसमान नियम लागू करण्यात आला आहे. त्याचसोबत तिहेरी तलाक वरुन मुस्लिम बांधवांमध्ये आनंद आहेच. पण काहींनी याबाबत विरोध केल्याने त्यांनी स्वत:चा निर्णय आधी घ्यावा असे ही मोदी यांनी सभेवेळी म्हटले आहे.(महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: नरेंद्र मोदी, अमित शहा, उद्धव ठाकरे यांचा प्रचारदौरा; पश्चिम महाराष्ट्र व पुणे सहित आजच्या सभांचे वेळापत्रक)

ANI Tweet:

एवढेच नाही तर विरोधकांना भाजप सरकारचे काम गेल्या 5 वर्षात आवडले नसून सातत्याने टीका करत आले आहेत. तर शिवसेना-भाजप युती एक सक्रिय आणि सामर्थ्यशाली सुद्धा आहे. तसेच सध्या नव्या भारताचा जोश पहायला मिळत आहे. जगातील प्रत्येक शक्ति आद भारताचा आवाज ऐकत आहे. नवा भारत हा फक्त मोदींमुळे नाही तर तुमच्या मतामुळे निर्माण होत आहे. त्याचसोबत पुढील पाच वर्षासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार पुन्हा यावे यासाठी तुमच्या आशीर्वादाची अत्यंत गरज असल्याचे मोदी यांनी सभेवेळी म्हटले. त्याचसोबत लोकसभा निवडणूकीवेळी ही तुम्ही आमच्यावर दाखवलेला विश्वास याचा मी खुप आभारी असल्याची भावना मोदी यांनी व्यक्त केली.